आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईचा बटव्यात डॉ एम.बी.पवार यांचे अंधश्रध्दा व आजार या विषयावर मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी नाशिक

आरोग्य धनसंपदा, आजिबाईचा बटवा
   विषय - अंधश्रध्दा आणि आजार.
     मी जगतराम बैसाणे,शिक्षक .
परतुर,नांदेड.
     आजारपणातं मंत्र .तंत्र,अंगात येणे,गुडी बघणे,भुत उतरवणे, पुनर्जन्म ,कुळीक उतरवणे,अंगारा लावणे,भगताकडे जाऊन विकार सांगुन गंडेदोरे गळ्यात बांधणे.हे आजार खरोखरच नष्ट होतात का? --- सर या विषयावर लिहा.
        आपण सुशिक्षित असुनही आयुष्यात कधीकधी एखादी गोष्ट अंधळेपणाने मनात स्विकारतो.याला अंधश्रध्दा म्हणतात.उदाः -
मंत्र- तंत्र.जादुटोणा,भुत पिशाच्च.
पुनर्जन्म ,गुडी बघणे.कुळीक उतर
विणे.भगताकडे जाऊन गुडी बघणे
हा अंधविश्वास आजही उच्च शिक्षित समाजातील  व्यक्तीच्या मनातुन जात नाही.याला कारण मानसिक विचारसरणी .अफवा.विश्वास.आहे.तो एक दुसऱ्या पर्यत सहज पसरला जातो.त्याची कृती
केली जाते.त्याचा आपल्यासह
इतर प्राणी जिवनावर वाईट परिणाम होतो.बोकडबळी हा एक अंधश्रध्देचा प्रकार आहे.
       आपल्या देशात महिला या
नेहमी अंधश्रध्देला मानतात.आणि
समाजात पसरविण्यासाठी मदत करतात.कारण त्या स्वभावाने हळवे.सोशिक.मायाळु.विचारी.आणि पुरुषापेक्षा जास्त प्रमाणात अडीअडचणीना.पराजय आणि निराशा यांना संसारात सामोरे
जात असतात.त्याच्या विचारात
अगतिक भावना असते.मनाने
हळवे.प्रेमळ.विचारी असतात.त्या
मुळे त्या महाराज.बुवाबाजी.भगत
पंडे.अघोरी उपचार करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास संपादन करुन
आजारपण कसे जाईल.याचा विचार करुन  समाजात प्रथा पसरविण्याचे कार्य करतात.
         कारण धर्माने रुजविलेली
विषमता आणि स्रियांचे दुय्यम स्थान यांच्यात त्या सतत हतबल
होतात.सर्व कालबाह्य परंपरा.
चालिरिती आणि कर्मकांड यामधिल बारकावे महिला शोधत
असतात .त्यामुळे पुजाअर्चा. दैविक श्रध्दास्थान त्या नेहमीच शोधतात.रोगमुक्त होण्यासाठी 
सतत धडपड करतात.त्या आजार
पणाला खचुन जातात.त्यामुळे शेजारी पाजारी अथवा गांवागावा
तिल तांत्रिक - मांत्रिक.अध्यात्मिक
बुवाबाजीच्या खोट्या आश्वासांना भुलून नवर्यासह नातेवाईकांना त्या सहज घेऊन जातात.घरात कितीही सुशिक्षित असो.स्रिया
समोर कुणाचे काहीही चालत नाही.हे त्रिवार सत्य आहे.आजही बर्याचश्या घराघरात स्रियांना मासिक पाळीत.अथवा गरोदर पणात पुजाअर्चा विशिष्ट समारंभात यांना बसविले जात नाही.मुलाप्रमाणे मुलींना समानते
ची वागणूक दिली जात नाही.त्या कितीही शिकल्या तरी दुय्यम स्थान त्यांना दिले जाते.हि पण एक अंधश्रध्दाच आहे.
         जग विकसित होऊन मानवाने प्रत्येक क्षेत्रात ऊच्च भरारी घेतली.मानवाची प्रगती महान आहे.औद्योगिक .आरोग्यि
क.अणुविषयी.शस्त्रकर्म .विषयात महान कार्य करुन परग्रहावर संशोधन सुरुच आहे.आरोग्य विषयी अलोपँथी.होमिओपँथी आयुर्वेदीय.युनानी यातही भरपूर संशोधकाला यश मिळत आहे.तरी अंधश्रध्देवर निम्मे पेशंट विश्वास ठेवतात.हे एक आश्चर्य आहे.
       स्रियांनी सर्व संकटाना खचुन न जाता सतत नवनविन शिकुन सर्व आजाराला सामोरे जावयाला पाहिजे.यालाही एक कारण आहे. स्रिने लहानपणी पित्याच्या आद्नेत.तरुणपणी नवर्याचा आणि म्हातारपणी मुलांच्या आद्न्येत रहावे लागते.असाच समज आहे.जिवनात तिला कधी स्वातंत्र्य 
नाही.दडपणात वागविले जाते. म्हणून ती कुणावरही विश्वास ठेवते
म्हणून अंधश्रध्दा पसरते.आज नविन ग्यानानुसार.अश्या पध्दती बदण्याची गरज आहे.पणं अफवा
वर विश्वास ठेवण्याची पध्दत चुकीची आहे.उदाः- काविळच्या रुग्णाला अँंलोपँथी नको. तसेच विषमज्वरमधे तेलकट.तुपकट बंद
गंडे दोरे.देवळाच्या मंदिरात नेणे.
इत्यादी प्रथा चुकिच्या आहेत.कधी जाहिराती वाचुन आयुर्वेदीय औषधी देणे.कुणाच्या अनुभवाने जडिबुटी रुग्णाला देणे.ह्या समजुती समाजात पसरविल्या जातात.याला अंधश्रध्दाच म्हणतात .
         मेडिकल प्रक्टिस मधे ही
आज निष्णांत हुषार डाँक्टर ग्रामिण सह शहरी भागात रुग्ण सेवा सतत अहोरात्रं करुन समाजाला रोग मुक्त करुन निरोगी शरिर व मन तंदुरुस्त करुन समाज
सेवा करित आहे.शासनाच्या सह्याने आरोग्य सेवा प्रत्येक खेडोपाडी उपलब्धता करुन भारतातील नागरिक सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी राष्ट्रीय मिशन उभारली जात आहेत.
        क्षय.मलेरिया.करोना .असे आजारांचे निर्मुलन झाले आहे. कँन्सर.मधुमेह.हृदय विकारामधे यशस्वी प्रगती होऊन  मानवी आयुष्यमान वाढत आहे.आपण अंधश्रध्दा यावर विश्वास ठेवु नये.कोणत्याही आजारपणाला आपल्या जवळच्या फँमिली फिजिशियन चा योग्य सल्ला घेऊन नतंर स्पेशालिस्ट डाँक्टरांचे मार्गदर्शन घेऊन रोगमुक्त होणे. महत्त्वाचे आहे.आजारपणात योग्य विश्रांती .औषधी.रक्तलघवी तपासणी .एक्स रे.सोनोग्राफी. स्कँन.इतर शारिरीक तपासणी करुन सतत रोगमुक्त रहाणे महत्त्वाचे आहे.त्यासाठीच भरपूर हसावे.बोलावे.फिरावे.व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.अंधश्रध्दा ह्या अफवा आहेत.
मार्गदर्शन डॉ‌.एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी नाशिक 
    

Post a Comment

Previous Post Next Post