नवापूरात गौ बारस निमित्त गौमाता पूजन व भव्य महाआरती चे आयोजन.....

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    नवापूर शहरातील सुंदरपूर  रस्त्यावर असलेल्या स्व सौ मंजुळादेवी अग्रवाल सेवाभावी संस्था संचलित स्व.मंजुळादेवी अग्रवाल गौ शाळेत सालाबादप्रमाणे आज वसुबारस निमित्ताने  गौ माताची  पुजन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले  होते.
      100 पेक्षा जास्त असलेल्या गौ शाळेत 
आज असंख्य गौ भक्त सेवक सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू धर्मात गौ बारस निमित्त गायीचे पूजन केले जाते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात गौ मातेला राजमातेचा दर्जा दिल्याने राज्यातील गौ भक्त व गौ सेवकांच्या उत्साह अधिक वाढला आहे.
       आज या कार्यक्रमात धारेश्वर येथील आचार्य सुभेदा नंदजी महाराज, गुमानजी महाराज सुकवेल, गौ सेवक राजेंद्र गावित, किरण टिभे, संचालक रमेशचंद्र अग्रवाल, नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालक किशोरभाई दलाल,अजय अग्रवाल, विकास शाह, दैनिक पत्रकार संघाचे सहसचिव प्रकाश खैरनार, कोषाध्यक्ष प्रेमेंद्र पाटील 
सह नवापूर शहरातील असंख्य गौ भक्त उपस्थित होते.
    आपल्या प्रास्ताविकात किरण टिभे यांनी गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या गौ बारस निमित्त या गौशाळेत गौ बारस निमित्त गौ मातेचे पूजन व महाआरती होत असुन या वर्षी शहरात पाच ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचा आनंद होत असुन पुढिल वर्षी जास्त ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली व शासनाने गौ मातेला राजमातेचा दर्जा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
    यावेळेस आचार्य सुभेदा नंदजी महाराजांनी देखील गौ मातेचे महत्त्व गौ मातेचे दुध, गौमुत्राचे महत्व सांगितले तसेच भीमकपूराचा घरात नियमित वापर केल्यास आॉक्सिजन वाढतो म्हणूनच अमेरिकेत देखील या वस्तूंचा वापर होत आहे.सनातन धर्मात गौ मातेचे महत्त्व असुन आपल्या मुला बाळांना देखील हे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.
      सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजुदादा गावीत तर आभार दर्शन पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोनु अग्रवाल,सोनु अग्रवाल, राहुल दुसाने, रामकृष्ण पाटील संजय अग्रवाल , कौस्तुभ टिभे सह शहरातील व परिसरातील गौभक्तांनी परिश्रम घेतले 

Post a Comment

Previous Post Next Post