नवापूर वरिष्ठ महावद्यिालयाला नॅकचा बी ++ दर्जा प्राचार्य डॉ. ए. जी. जायस्वालांचा जि. प.च्या माजी अध्यक्ष रजनीताई नाईक यांच्या हस्ते सत्कार

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   येथील आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था नवापूर द्वारा संचलित वरीष्ठ महाविद्यालयाला नॅक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत बी++ दर्जा मिळाल्याने जी. प. माजी अध्यक्षा सौ. रजनीताई नाईक यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. अजितकुमार जायस्वाल यांना सन्मानित करण्यात आले.
   स्व. प्रताप केशव पाटील सभागृहात पार पडलेल्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून युवा नेतृत्व डॉ. नचिकेत नाईक, युवा काँग्रेस शहर अध्यक्ष करीष्मा नाईक, संचालक दिपक वसावे, प्राचार्य डॉ.संजय अहिरे, प्रा.चंद्रकांत शेटे, माजी नगराध्यक्ष दामु बिन्हाडे, आर. डी. राजपूत, सोहेलभाई बलेसरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
   रजनीताई नाईक यांनी सांगितले की, नॅकच्या पुनर्मुल्यांकन समितीने महाविद्यालयाची सर्वांगीण पाहणी केली. त्यात महाविद्यालयाला बी++दर्जा मिळाला ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. नचिकेत नाईक यांनी त्यांच्या वक्तव्यातून महाविद्यालय राबवत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला व विविध उपक्रमांद्वारे महाविद्यालय स्वताचे वेगळेपण कसे जपत आहे हे विशद केले व महाविद्यालयाला सन्मान जनक दर्जा
महाजन यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
  यापूर्वी महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात तीन वेळा ए ग्रेङ मिळालेली असुन, मानवाधिकारआयोग नवी दिल्ली यांनी ए ग्रेड दिला आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत भारतातील 171 स्वच्छ महाविद्यालयाची निवड केली त्यात या महाविद्यालयाचा समावेश असल्यामुळे महाविद्यालय राष्ट्रीय पातळीवर कौतुकास पात्र ठरले, महाराष्ट्र शासनाचा जागर जाणिवांचा अभियाना अंतर्गत महाविद्यालयाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
  . प्राचार्य डॉ. अजितकुमार जायस्वाल, समन्वयक डॉ. एस. बी. महाजन तसेच त्यांच्या संपुर्ण टीमचे रजनीताई नाईक यांनी अभिनंदन करत प्राचार्य डॉ. जायस्वाल व समन्वयक.प्राचार्य डॉ. संजय अहीरे, प्राचार्य चंद्रकांत शेटे, डॉ. आय. जी. पठाण, डॉ. आर. डी. पाटील, डॉ. सुनिल बोरसे, डॉ. नितीन माळी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. दीपक जायस्वाल यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. श्रीमती मंदा गावित यांनी आभार मानले, कार्यक्रमास संस्था परिवारातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post