19 व 20 तारखेच्या निवडणूक ड्युटीवर असलेल्या शिक्षक शिक्षकेतरना सुट्टी देण्याबाबत आ.डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मुख्याध्यापक बंधू भगिनींना आवाहन.....

मुंबई सत्यप्रकाश न्युज 
   महाराष्ट्र राज्यातील सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनींना विनंती करण्यात येते की उद्यापासून आपले शिक्षक शिक्षकेतर बांधव  निवडणुकीच्या ड्युटी साठी जात  आहेत
    ग्रामीण भागातील अनेक शिक्षक -शिक्षकेतर बांधवांना  दिनांक 19 नोव्हेंबर पासून  सकाळी 5.00 वाजल्यापासूनच  बस स्थानकामध्ये बोलावले आहे, तर काहींना  सकाळी 8.00 वाजता ज्या तालुक्यात ड्युटी आहे त्या ठिकाणी  बोलावलेले आहे, ड्युटी चे ठिकाण हे शिक्षक राहत असलेल्या जागेपासून बऱ्याच लांबच्या अंतरावर  अन्य तालुक्यात आहेत,   ज्या शाळेतील सर्वच शिक्षक शिक्षकेतर बांधव  ड्युटीवर जाणार असतील तर त्यांना शाळेत येण्यास अडचण निर्माण होऊ शकते  व शाळा भरवू  शकत नाहीत.
      20  तारखेला  सर्वजण ड्युटीवर असणार आहेत, दोन दिवस निवडणूक ड्युटीवर असल्याने आपल्या शिक्षक शिक्षकेतर बांधवांना  आपोआप मानसिक ताण तर येतोच तसेच  मतदान प्रक्रियेत  खूप परिश्रम करावे लागणार आहेत,  ड्युटी संपल्यानंतर मत पेट्या व  मतदान प्रक्रियेचे सर्व साहित्य जमा करण्यासाठी  अनेक शिक्षक- शिक्षकेतर बांधवांना उशीर होऊन घरी पोहोचण्यासाठी मध्यरात्री होऊ शकते. या यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आपल्याला अनुभव आलेला आहे, त्यामुळे अनेक शिक्षकांना मानसिक त्रास होऊन आजारी पडल्याचे सुद्धा तक्रारी आलेल्या आहे.
      या सर्व गोष्टींचा सहानुभूतीने विचार करून मुख्याध्यापक बांधवांनी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी ज्या शिक्षकांना पहाटे लवकर जायचं आहे  व 20  नोव्हेंबर रोजी उशिरा पर्यंत  निवडणुकीचे कामकाज करावयाचे आहे ,त्या शिक्षक- शिक्षकेतर बांधवांना  आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कोणत्याच प्रकारचा ताण येऊ न  देण्यासाठी  सुट्टी द्यावी, सर्वांनी आपल्या सहयोगी कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची गरज आहे, म्हणून हे दोन दिवसाचे सुट्टीचे दिवस, पुढील सुट्ट्यांच्या कामकाजामध्ये कुठेतरी अड्जस्ट करून घेता येतील, किंवा पुढील शनिवार रविवारी सुद्धा शाळा भरवून,  झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढता येईल.
       याचे सर्व डिसिजन घेण्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे, त्यामुळे  शाळेला किंवा कर्मचाऱ्यांना  सुट्टी दिल्याने कोणतेही अडचण येणार नाही,  असे मी माध्यमिक  मुख्याध्यापक संघाच्या वतीने राज्यातील सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनींना विनंती  शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनी केली आहे.

1 Comments

  1. नेमकी सुट्टी कधी दयावी काहीच सुस्पष्टता नाही बातमीत

    ReplyDelete
Previous Post Next Post