नवापूर सत्यप्रकाश न्युज
नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करणे हा आपला हक्क असुन तो सर्वांनी वेळात वेळ काढून आवर्जून बजावला पाहिजे असे आवाहन नवापूर शहराचे माजी नगराध्यक्ष व उद्योजक श्री विपीनभाई चोखावाला यांनी केले आहे.
मी 88 वर्षाच्या वयात मतदानाचा हक्क बजावला असून एक एक मताला आज फार महत्त्व असुन या राष्ट्रीय कार्यात नवापूर तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिकांनी अवश्य आपला सहभाग नोंदविला पाहिजे मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे तरी आपण सर्वांनी या काळात आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपले कर्तव्य बजावावे असे आवाहन केले आहे.
Tags:
सामाजिक