नवापूर शहरवासी व तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात येते की, उद्या दिनांक 23.11.2024 रोजी नवापूर विधानसभा मतदारसंघाची श्री.सुरुपसिंग नाईक टाऊन हॉल, नवापूर येथे सकाळी 07.00 वाजेपासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सदर मतमोजणी प्रक्रिया दरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारची वाहतुकीस/रहदारीचा अडथळा निर्माण होऊ नये करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते वनिता विद्यालय पावेतो सकाळी 07.00 वाजेपासून संध्याकाळी 04.00 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या दुचाकी/तीन चाकी/चार चाकी वाहनांना पार्किंगची मनाई करण्यात आलेली आहे. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी..*त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील/तालुक्यातील गावात कामात व्यत्याय येऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने निर्वाचन क्षेत्रात भरत असलेले आठवडे बाजार व जत्रा बंद ठेवणे आवश्यक आहे बाबत खात्री झाल्याने मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयकडील पत्र क्रमांक 2024/गृह/कक्ष-2/ड -2/कावी-456 नंदुरबार दि.18.11.2024 अन्वये दिनांक 23.11.2024 वार शनिवार रोजी भरणारे आठवडे बाजार व जत्रा बंद ठेवणे बाबत आदेश पारित झालेले आहे.तरी दिनांक 23.11.2024 रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक नवापूर पोलीस स्टेशन यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
तसेच उद्या भरणारा आठवडे बाजार देखील बंद राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.