नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत येणार्या नवीन सरकारांकडून मतदारांचा अपेक्षा विषयी करसल्लागार नितीन डोंगरे, कोपरगांव यांच्या प्रतिक्रिया....

कोपरगांव सत्यप्रकाश न्युज 
      दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये मतदारांनी त्यांच्या व्यक्तिगत मतप्रवाहनुसार त्यांचे मतदान पार पाडलेले दिसून येते, अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यात अतिशय उत्तम मतदानाची आकडेवारी जाहीर झालेली असली तरी सुद्धा प्रत्यक्षात कोणत्या पक्षाला मतदारांनी तारले ?
किंवा कोणत्या पक्षाला मतदारांनी
कशी मती दिली आहेत ?
याचे निश्चित चित्र येत्या दिनांक २३
रोजी सर्वांना पहावयास मिळणार आहे. राजकीय पक्ष कोणतेही असोत,
त्यांची कार्यप्रणाली कशीही असो,
नेतेमंडळी कसेही असोत, 
मात्र त्या नेते मंडळीचा सर्वसाधारण मतदारांमध्ये कसा वावर आहे ?
आजपर्यंतचे त्यांचे कामकाज, त्यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा जर खरा असेल तर, त्याचे निश्चित चित्र
आपल्याला येत्या तीन दिवसात बघायला मिळणार आहे. 
आज जरी कोणत्याही चॅनलने किंवा एक्झिट पोलने असे निकाल जाहीर केले असतील, तरीसुद्धा ते निकाल किंवा ते अंदाज कितपत यशस्वी होतील?  याबाबत कोणालाही निश्चित विधान करता येणे अवघड आहे.
मात्र जर लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवायची असेल तर जास्तीत जास्त मतदारांनी त्यांचे मतदान केले तरच यातून योग्य उमेदवार आणि राज्याला योग्य "आमदार" योग्य लोकप्रतिनिधी लाभणार आहे. 
बाकी राजकीय खिचडीचा अंदाज आज तरी कोणालाही करता येणे शक्य नाही
ही सत्य बाब आहे. 
आणि होय, तसे होणारही नाही हे मान्य करावेच लागेल.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका नेहमीच महत्त्वाच्या ठरतात,
कारण राज्याची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दिशा या निवडणुकांमुळे ठरते. प्रत्येक नागरिकाला चांगले आणि सुशासन देणारे सरकार अपेक्षित असते.
कोणाचे सरकार यावे?
   याबाबत तुमच्या अपेक्षा आणि प्राधान्यांवर अवलंबून उत्तर बदलू शकते. परंतु काही सामान्य गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो 
उदा.- सुशासन म्हणजे, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असावे.
निर्णयप्रक्रिया वेगवान आणि लोकहितकारी असावी.शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवणारे, पाणी व्यवस्थापन करणारे आणि कर्जमाफी किंवा शाश्वत उपाययोजनांवर काम करणारे सरकार हवे.स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या औद्योगिक धोरणांची अंमलबजावणी करणारे सरकार म्हणजेच औद्योगिक क्षेत्रात कार्य करणारे सरकार असावे,राज्याची परकीय गुंतवणूक वाढवून राज्याचा आर्थिक विकास घडवणारे सरकार असावे.
    या सरकारची धोरणे सामाजिक आणि आरोग्यविषयक बाबींची दखल घेणारे असावे,शिक्षण, आरोग्यसेवा, आणि महिलांच्या सुरक्षेसाठी भरीव पावले उचलणारे नेतृत्व त्यांचेकडे असणे महत्त्वाचे वाटते.त्याचबरोबर, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आदर करणारे नेतृत्व त्यांचेकडे असणे आवश्यक आहे.आपलं राज्य हे पुरोगामी विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जातं, या महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरांचा सन्मान करणारे नेते या विधानसभेत असावेत.
  आजच्या निवडणुकीपूर्वी अनेक पक्षांनी त्यांचे जाहीरनामे मतदारांसमोर मांडलेले होते, यापैकी मतदारांच्या किती अपेक्षा पूर्ण होऊ शकतील हे येणारा काळच सांगू शकेल,  त्या पक्षांनी सुद्धा, त्यानुसार स्वतःला पारखून, तपासून लोकांसाठी किती व्यावहारिक आणि परिणामकारक योजना आपण राज्यासाठी देऊ शकतो आहोत हे बघणे आवश्यक आहे.
  शेवटी, कोणते सरकार यावे याचा निर्णय जनतेच्या हातात असतो. योग्य नेतृत्व निवडण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मताचा उपयोग करणे महत्त्वाचे असते तो त्यांनी केला असावा असे आपण गृहीत धरू या. निवडून येणारे यशस्वी उमेदवारांनी, मनापासून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा                            ‌‌ नितीन डोंगरे
                     करसल्लागार , कोपरगाव

Post a Comment

Previous Post Next Post