येथील दी एन.डी.अँड एम. वाय सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे शाह कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक- 13 नोव्हेंबर 2024 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवापूर पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रेखा पवार , शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते, केंद्रप्रमुख शैलेश राणा, नवापूर शहरातील सर्व हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा नवापूर पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रेखा पवार होत्या व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तारअधिकारी किशोर रायते व केंद्रप्रमुख शैलेश राणा होते. सुरुवातीला नवापूर पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रेखा पवार यांचा सत्कार सार्वजनिक गुजराती हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख यांनी केला. शिक्षण विस्तारअधिकारी किशोर रायते यांचा सत्कार सार्वजनिक गुजराती हायस्कूलचे पर्यवेक्षक फारुख पटेल यांनी केला. तदनंतर केंद्रप्रमुख श्री शैलेश राणा यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती रेखा पवार यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी आपल्याला प्रत्येकाला मतदान करणे गरजेचे आहे असे सांगितले. मतदानाचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणातून पटवून दिले. त्यानंतर मतदानाविषयी विविध घोषणा जमलेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या. त्यानंतर नवापूर शहरातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती विषयी 'vote for better India, मेरा मत, मेरा अधिकार' अशा विविध घोषणा दिल्या. या कार्यक्रमात शहरातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
निवडणूक