विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले. विधानसभा नवापूर क्षेत्राच्या परिघात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.
नवापूर शहरात निवडणुकीनिमित्त कायदा सुव्यवस्था आबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या उपस्थितीत पथसंचलन झाले. पथसंचलनाला नवापूर पोलिस ठाण्यापासून सुरुवात झाली. शास्त्रीनगर, नारायणपूर रोड, लिमडावाडी, महात्मा गांधी पुतळा, लाइट बाजार, बसस्थानक परिसरमार्गे पुन्हा नवापूर पोलिस ठाण्यात येऊन पथसंचलनाची सांगता झाली. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन, भाऊसाहेब लांडगे, जगदीश सोनवणे, विनोद पराडके, रणजित महाले, साहेबराव बहिरम, किशोर वळवी आदी उपस्थित होते.
तालुक्यातील नवागाव, चिंचपाडा येथेही नवापूर पोलिसांनी पथसंचलन केले. सीआरपीएफ, गुजरातमधील बडोदा येथील एसआरपी, नवापूर पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते.
Tags:
शासकीय