येथील कला,वाणिज्य विज्ञान महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य वाय.जी.भदाने यांच्या हस्ते संविधान पुस्तिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रतिमा पूजन झाल्यानंतर नवापूर उप जिल्हा रुग्णालयातील एकात्मिक समुपदेशन केंद्राचे समन्वयक श्री कैलास माळी यांनी उपस्थितांना देशाच्या घटनेचे महत्व पटवून दिले व प्रत्येकाने संविधानाची प्रस्ताविका अंगीकारली तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तेच खरे अभिवादन असे आवाहन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, वरिष्ठ लिपिक व प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित होते.
प्राचार्य डॉ ए जी जयस्वाल उपप्राचार्य मंदा गावित यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से यो कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेखा बनसोडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एकनाथ गेडाम यांनी प्रास्ताविकेचे समूह वाचन करून घेतले.
---------------------------------------------------- राष्ट्रीय सेवा योजना तर्फे रेड रिबीन क्लब चे उद्घाटन नवापूर येथील कला,वाणिज्य विज्ञान महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे नवापूर उप जिल्हा रुग्णालयातील एकात्मिक समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रेड रिबन क्लबचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य मंदा गावित, नवापूर उप जिल्हा रुग्णालयातील एकात्मिक समुपदेशन केंद्राचे समन्वयक श्री कैलास माळी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश अहिरराव, प्रा, आनंदा काळबांडे, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी डॉ एच बी सरतापे,प्रा अनिल पाटील, डॉ सी एल सुरवाडे, प्रा ए ए मुळे, प्रा अंतेश गावित वरिष्ठ लिपिक व इतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित होते.
प्राचार्य डॉ ए जी जयस्वाल उपप्राचार्य वाय जी भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से यो कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेखा बनसोडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एकनाथ गेडाम यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले.
Tags:
शैक्षणिक