दि नवापुर एज्यूकेशन सोसायटी संचालित दि एन डी अँड एम वाय सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच जे शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापुर, तालुका - नवापुर, जि-नंदुरबार येथे दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख होत्या. प्रमुख अतिथी शाळेचे माजी पर्यवेक्षक श्री फारुख पटेल सर हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे उपशिक्षक श्री जी एच मणियार यांनी केली. शाळेतील विद्यार्थी आसेफा याकूबभाई पठाण,
विकेश वंन्तया काथुड,
सानवी पंडित गावित यांनी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख यांनी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस का साजरा केला जातो याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गीता राजपूत यांनी केले व आभार प्रदर्शन श्री अशोक चौधरी यांनी केले. शाळेचे प्राचार्य श्री संजय कुमार जाधव, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख यांच्या मार्गदर्शनाने व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
Tags:
शैक्षणिक