नवापूर वरिष्ठ महाविद्यालयातील कु. मीना शहा यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार

 नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    येथील वरिष्ठ महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी कु. मीना शहा यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे सन 2023 साठी उत्कृष्ठ शिक्षकेत्तर कर्मचारी (महाविद्यालयीन आस्थापना, वर्ग - ३) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार वितरण सोहोळा विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. प्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व  कुलगुरू मा. प्रा .डॉ. व्ही. एल. महेश्वरी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या समारंभात कु. मीना शहा यांना प्रदान करण्यात आला. कु. शहा यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार श्री शिरीषकुमार नाईक, उपाध्यक्ष हरीशकुमार अग्रवाल , प्राचार्य डॉ ए.जी.जायस्वाल संस्थेचे इतर सन्माननीय पदाधिकारी, , उपप्राचार्य, कार्यालयीन कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

Previous Post Next Post