जिल्ह्यातील मुरबाड- संगम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन व दर्शन आशीर्वचन महासन्मान सोहळा आयोजित केला होता, या सन्मान सोहळ्यात देशभरातून जगद्गुरु शंकराचार्य परम पूज्य स्वामी नारायणानंद तीर्थ, जगद्गुरु परमहंसचार्य - आयोध्या जगद्गुरु डॉक्टर कृष्णानंद गिरी - उत्तर प्रदेशव विश्वगुरू सन्मानित हरिभक्त पारायण नामदेव हरड व देशभरातून आलेले अनेक तपस्वी साधू, संत महात्मे उपस्थित होते, या महान व तपस्वी साधुसंतांच्या पदस्पर्शाने मुरबाड येथील संगम परिसर पवित्र व मंत्रमुग्ध झाले होते,
या विराट आंतरराष्ट्रीय संत संमेलनात कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना "विश्व सन्मान जीवन गौरव" शंकराचार्य, विश्वगुरू व संत महात्म्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक कार्यामध्ये मनोभावी सेवा करणारे, प्रत्येकाला हवेचे असे वाटणारे, सर्वांच्या अडीअडचणीत धावून जाणारे, निर्मळ आणि स्वच्छ लोकांची सेवा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून हा सन्मान आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा करण्यात आला व विद्यार्थी, शिक्षक,शाळा, संस्था यांच्या अडीअडचणी, समस्या सोडवून, लोकसेवा घडावी असा शुभाशीर्वाद संत महात्म्यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी यांना दिला
सोबत शिवछत्रपती संघटनेचे सल्लागार चंद्रकांत पवार सर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भोईर सर, संदेश गोडांबे सर, खापरे सर अन्य शिक्षक शिक्षकेतर बांधव उपस्थित होते
Tags:
यश /निवड