शहरात पुन्हा शनिवारी किमान तापमान ४.४ अंश नोंदवण्यात आले. पाच दिवसांपूर्वी १० डिसेंबरला तापमान ४ अंश नोंदवले होते. येत्या काही दिवसांत तापमान आणखी कमी होईल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. थंडीचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहे.
शहरात एक आठवड्यापासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. काही दिवसांपासून किमान तापमान सांतत्याने १० अंशांच्या खाली आहे. त्यामुळे दिवसभर गारठा जाणवत असतो. दोन दिवसांपासून शहरात थंड वारे वाहतात आहे. शहराचे किमान तापमान शुक्रवारी ६ अंश होते. ते शनिवारी दोन अंशांनी घसरले. तसेच कमाल तापमान २६.५ अंश होते गारठा वाढणार आहे.
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरातील किमान व कमाल तापमानात घट होते आहे. पुढील आठवड्यात किमान तापमानात आणखी घट होऊन ४ अंशांखाली तापमान जाण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हिवाळ्यात एकाच आठवड्यात दोन वेळा किमान तापमान ४ अंशांपर्यंत घसरल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. रात्री आट ते साडेआठ वाजेनंतर शहरात शुकशुकाट होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, थंडी वाढल्याने आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे थंडीच्या दिवसात दमा असणाऱ्यांना जास्व त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाह वैद्यकीय व्यावसायिकांनी केले आहे.
Tags:
हवामान