दि नवापुर एज्यूकेशन सोसायटी कडून विद्यार्थ्यांच्या विविध कलासिद्धी प्रोत्साहन कार्यक्रम

नवापूर : सत्यप्रकाश न्युज 
     दि नवापुर एज्यूकेशन सोसायटी कडून दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी  दि एन. डी. अँड एम. वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय नवापूर ,आणि पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर या दोन्ही शाळेतील  विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार  व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम  संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष दि.नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विपिनभाई  चोखवाला हे होते. प्रमुख अतिथी संस्थेचे सन्माननीय सदस्य  हेमंतभाई शाह, संस्थेचे सदस्य  .कल्पेशभाई जोशी, व निमंत्रित सदस्य .जिग्नेशभाई शाह, सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य.संजय कुमार जाधव, सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  मिलिंद वाघ , सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या  उपमुख्याध्यापिका श्रीमती. कमलबेन परिख,  सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका  श्रीमती. मेघा पाटील, दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.                   कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती.निर्जलाबेन सोनवणे यांनी केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व आलेले सर्व अतिथी यांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीला नंदुरबार येथे आयोजित  जिल्हास्तरीय युवा महोत्सवात फोटोग्राफी या कला प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविलेली सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.धनश्री पाटील हीचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर वकृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविलेल्या सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी  गौरी जाधव हिचा  सत्कार करण्यात आला व बक्षीस वाटप करण्यात आले. 
      नंदुरबार येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवात समूहगीत गायनात तृतीय क्रमांक मिळविलेल्या सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमात पुढे नंदुरबार येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवात कृतीयुक्त समूह गीत गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक  मिळविलेल्या व माणिकरावजी विद्या प्रसारक संस्था, नेहरूनगर,नवापूर अंतर्गत स्वर्गवासी सौ. हेमलताताई वळवी, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा,कारेघाट येथे आयोजित कार्यक्रमात कृतीयुक्त समूहगीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेल्या  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
         यानंतर सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,नवापूर येथील विविध  स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला माणिकरावजी विद्या प्रसारक संस्था नेहरूनगर नवापूर अंतर्गत स्वर्गवासी सौ.हेमलताताई वळवी, अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा, कारेघाट , येथे आयोजित कृतीयुक्त समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी दोन्ही शाळांमधील विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या  विद्यार्थ्यांनी आपले कार्यक्रम  मान्यवरांच्या व सर्वांच्या समोर सादर केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनी दाद दिली व प्रोत्साहन दिले.
संस्थेच्या दोन्ही शाळातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाचा संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.श्री. विपिनभाई  चोखावाला यांनी कौतुक केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकानी असेच यश मिळवित रहावे, व संस्थेचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली. 
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती यास्मिन फकीर व श्री गणेश महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गणेश महाजन यांनी  केले.

Post a Comment

Previous Post Next Post