येथील दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथील राष्ट्रीय खेळाडू व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला
दिनांक : 20 डिसेंबर, 2024 - दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथील राष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू कु.निलेश मुकेश भरवाड व महाविद्यालयाचा माजी यशस्वी विद्यार्थी कु.हर्ष अजयभाई पंचाल (Senior Scientist, USA) यांचा आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून संस्थेचे सह-सचिव श्री. शोएबभाई मांदा, प्रमुख पाहुणे श्री. संदीप मनुभाई पटेल (एडव्होकेट - गुजरात हायकोर्ट), श्री. नीरज रामेशभाई पटेल (गायक - भारत व ऑस्ट्रेलिया), शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजयकुमार जाधव सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती. कमलबेन परीख व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दिनांक 30 नोव्हेंबर व 02 डिसेंबर 2024 रोजी क्रीडा प्रबोधिनी, जालना येथे 14 वी सब-ज्युनिअर मुले व मुली राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचा संघ देखील सहभागी झाला होता. सदर संघात दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल, नवापूर येथील विद्यार्थी देखील सहभागी होते. त्यामध्ये कु.निलेश मुकेश भरवाड याने सदर राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत दि.25 ते 28 डिसेंबर 2024 रोजी तांबरम, चेन्नई - तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात केली. सदर खेळाडूस शाळेचे क्रीडा श्री. श्रीकांत पाटील सर व श्री. निलेश गावंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
यानंतर शाळेचे माजी यशस्वी विद्यार्थी कु.हर्ष अजयभाई पंचाल (Senior Scientist & Supply Chain Manager, Genom Editing & Technology, USA) यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कु.हर्ष अजयभाई पंचाल यांचे ई.1 ली पासून ते महाविद्यालयीन शिक्षण हे दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे पूर्ण झाले आहे. कु.हर्ष हे शालेय जीवनात अत्यंत हुशार, मेहनती व स्वभावाने मनमिळाऊ होते. त्यांनी त्यांचे पुढील उच्च शिक्षण हे Bachelor in Biotechnology (Molecular Biology) व Master in Oncology (Procision Medicine) मध्ये पूर्ण केले. त्याचबरोबर त्यांनी Certificate in Bioinformatics व MBA in Data Science & Entrepreneurship ही सुद्धा पदवी धारण केली आहे. कु.हर्ष अजयभाई पंचाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण व करिअर विषयी यशस्वी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जितेंद्र जगताप व श्रीमती. गीता राजपूत यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती. डॉ. कामिनी राणा यांनी केले.
राष्ट्रीय खेळाडू कु.निलेश भरवाड व माजी यशस्वी विद्यार्थी कु. हर्ष पंचाल यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.विपिनभाई चोखावाला, उपाध्यक्ष श्री.शिरीषभाई शाह, कार्याध्यक्षा श्रीमती.शितलबेन वाणी, कोषाध्यक्ष श्री.सतीशभाई शाह, सचिव श्री.राजेंद्रभाई अग्रवाल, सहसचिव श्री.शोएबभाई मांदा, मुख्याध्यापक श्री.संजयकुमार जाधव सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती.कमलबेन परिख तसेच सर्व व्यवस्थापन मंडळातील सदस्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व खेळाडूस स्पर्धेसाठी व हर्ष यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Tags:
यश/ निवड