येथील दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दि एन. डी.अँड एम,.वाय.सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच. जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय नवापूर ,जि. नंदुरबार
भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन तर्फे आयोजित "घर घर संविधान "कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना संविधान विषयक मार्गदर्शक व्याख्यान कार्यक्रम चे आयोजन आज 20-12-24 रोजी करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष दि नवापूर एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव हाजी शोहेब भाई मांदा हे होते. प्रमुख अतिथी एडवोकेट श्री संदीप भाई मनुभाई पटेल तसेच श्री नीरज भाई रमेश भाई पटेल होते तसेच शाळेचे प्राचार्य संजय कुमार जाधव , उपमुख्याध्यापिका श्रीमती कमल परिख व शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री जितेंद्र कुमार जगताप सर यांनी केली, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनने करण्यात आले .कार्यक्रमचे अध्यक्ष व उपस्थित प्रमुख अतिथी यांचे स्वागत करण्यात आले. 26 नोव्हेंबर 2024 ते 26 जानेवारी 2025 या अंतर्गत संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात यावे त्या अनुषंगाने शाळेत
*"घरघर संविधान कार्यक्रमच्या"* अंतर्गत तज्ञ मार्गदर्शक एडवोकेट श्री संदीप भाई मनुभाई पटेल यांनी मुलांना संविधान निर्मिती, त्याचे स्वरूप व नियमची माहिती मुलांना दिली व मुलांमध्ये संविधान बद्दलची जागृती निर्माण केली .श्री नीरजभाई रमेशभाई पटेल यांनी छान गीत सादरीकरण केलं आणि मुलांना देश प्रेम साठी प्रोत्साहित केलं. तसेच शाळेचे प्राचार्य श्री संजय कुमार जाधव सर यांनी मुलांना जीवनरुपी दिशा दाखवली व मार्गदर्शन केलं. त्यानंतर कार्यक्रमचे अध्यक्ष सहसचिव हाजी शोहेबभाई मांदा यांनी मनोगत व्यक्त केलं. असा प्रकारे घर घर संविधान अंतर्गत तज्ञ मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जितेंद्र जगताप व श्रीमती गीता बहेन राजपूत यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. कामिनी बेरी यांनी केले. शाळेचे
मुख्याध्यापक श्री संजयकुमार जाधव , उपमुख्याध्यापिका श्रीमती कमल परीख,
यांच्या मार्गदर्शनाने व तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाल.
Tags:
शैक्षणिक