भुसावळ (सत्यप्रकाश न्युज) –
दरवर्षी डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू होताच नववर्षाच्या आगमनाची चाहूल लागते.त्यात एका गोष्टीचे विशेष अप्रूप असते व ते म्हणजे नव वर्षाची दिनदर्शिका!! काळानुरूप दिनदर्शिका मध्ये अनेक बदल झालेत.पण तरीही बहुसंख्य दिनदर्शिका ना किमान सहा पाने तरी असतातच.अशी दिनदर्शिका भिंतीवर लावण्यासाठी उपयुक्त असल्या तरी प्रत्येक महिना संपून नवीन महिना सुरू झाला म्हणजे ह्या दिनदर्शिकेचे पांन उलट वावे लागते.ही गैरसोय दूर करून एकाच पानात संपूर्ण वर्षाची दिनदर्शिका तयार करता आली तर! अशी कल्पना भुसावळ येथील शिक्षणतज्ज्ञ व माजी मुख्याध्यापक प्र. ह.दलाल सर यांचे मनात आली.आणि मुळातच गणीतासह नवनवीन प्रयोग करण्याची आवड असलेल्या दलाल सरानी एक अभिनव दिनदर्शिका तयार केली तेव्हापासून सुमारे 25 वर्ष झाले दर वर्षी सर अशी दिनदर्शिका तयार करीत आहे.
एकाच पानात पूर्ण वर्षाची दिनदर्शिका सहज खिशात, पर्स,पाकीट यात ठेवता येईल .तसेच काचेखा ली टेबलावर ठेवून एकाच दृष्टिक्षेपात वर्षातील कोणत्याही महिन्याची तारीख, वार आपण बघू शकतो.सरांच्या ह्या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक व स्वागत केले आहे .आपल्या वाचकांसाठी सदर दिनदर्शिका देत आहोत.

Tags:
सामाजिक