आरोग्य धनसंपदा आजिबाईचा बटवा
विषय - नाडी परिक्षण
सर ! नाडी परिक्षण म्हणजे काय ? कशी करतात ? रोग निदान कसे करतात ?
या विषयावर लिहावे .
मी अनिल धोत्रे.जनकपुरी.वर्धा.
नाडी परिक्षण
इसवीसना पुर्वी आयुर्वेदीय शास्त्रात नाडी परिक्षण करुन मानवी शरिरातिल निर्माण झालेल्या आजाराचे रोग निदान तंतोतंत करुन वनस्पतींच्या जडिबु
टिच्या औषध उपचार करुन पुर्णतः
रोगनिवारणा होई. राम राज्यातही राजवैद्य होते. उदाः - रावणाचा भाऊ मेघानंदाच्या इंन्द्रजित या शक्तिशाली शस्राने लक्ष्मनाला मरणासन्न स्वरुपात बेशुध्द केले.
श्री हनुमानजी यांनी लक्ष्मनावर उपचार करण्यासाठी श्रीलंकेतुन वैद्य सुशेन यांना पाचारण केले.त्याच्या नाडी परिक्षनाने हिमालयातुन संजिवणी बुटी आणुन त्याचा काढा केला.लक्ष्मणाच्या मुखात टाकला.आणि त्याला पुर्णतः बरे वाटले.त्याकाळी राजवैद्य नाडी परिक्षणाने शरिराला निरोगी करत.
शरिराची उजव्या हाताच्या अंगठ्यावर आपल्या तिन बोटाचा हळुच स्पर्श केला तर आपणांस आजाराचे रोगनिदान करण्यास सहज मदत होते.हि एक आयुर्वेदी य शास्रात रोग निदान करण्याची पध्दत आहे.शरिरातिल प्रकृती,स्वास्थ,आजार,अशक्तपणा,अथवा कोणताही आजाराचे मुळ कारण वात,पित्त,कफ हे आहे.कारण ज्या
रक्त वहनाचे स्पंदन अर्थात शरिर
द्रव वाहणाऱ्या रक्तवाहिन्या निला व रोहिणी हृदयापासुन मेंदुकडे जाऊन पायापर्यत रक्तपुरवठा करतात.त्यांची स्पंदने मनगठाच्या नसाद्वारे समजते.ते आयुर्वेदात सांगितले आहे.
नाडी परिक्षण कसे करावे
रोगीच्या हृदयाकडिल बाजुच्या
हातावर मनगटावरील भागात रक्त
प्रवाह वाहणाऱ्या नसेवर आपली तिन बोट समान हळुवार ठेवावी.
वाहत्या रक्तवाहिनी ,रोहिणीवर बोट ठेवल्याने नाडीचा स्पर्श स्पदने
त्यावरील निर्माण होणारे अडथळे
,धक्का,कमीजास्त होणारा स्पर्श प्रत्येक बोटाचा आपणांस समजतो
यात वात,पित्त,कफ प्रवृत्तीची स्पदने ,ठोके.हळुवार स्पर्शाने कळतात.हे एक प्राचीन तंत्र आयुर्वेदीय शास्रात आहे.
१) नाडी परिक्षण हे सखोल, स्पर्श न्यानाने पारंपारिक पध्दतीने करतात.नाडीच्या रेडियल धमनीवर तीन बोट ठेऊन नाडी संवेदना, प्रवाहातिल अडथळे,यांचे मुल्याक
न केल्याने आजार समजतो.
२) नाडी परिक्षणाने खर्चिक तपासणी कमी होतात.अचुक निदान स्वस्तात होते.
३) नाडी परिक्षणाने मानसिक
व शारिरीक आजार.कफ,त्वचा. यकृताचे.पित्त प्रकृती वैद्यकाला
लवकरच कळते.
४) नाडी परिक्षणाने नाडीग्राफ
हा रक्त वाहणाऱ्या स्पंदनाने समजून आणि चेहऱ्याला भागावर
होणाऱ्या वेदना यातुन पटकन कळतो.
५) नाडी परिक्षण करुन मुत्र. मल.जिभ.शब्दोच्चार.स्पर्श आणि
दृष्टी सह आकृतीने रोगनिदान करतात.
६) हृदयातिल प्रत्येक रोहिणी
व निला यातिल वाहणारे रक्तातुन
निर्माण होणाऱ्या लाटावर होणारा बदल हेच खरे नाडी दोष आहेत.
नाडी परिक्षण प्रकार
१) तात्काळ अभिव्यक्ती परिक्षण --- यात शरिरातिल स्थुलपरिस्थितीतिल आजारांची माहिती मिळते.यात नाडी काटेरी,अनियमि
त,मऊ,उबदार नाडी हातास लागते २)वरवरची अभिव्यक्ती --- यात
शरिरातिल दोषक्रिया विलाप सहज कळतात.नाडीची गती मंद. हत्तीसारखी चालते,श्वसनात ब्रेथले सनेस.जिव घाबरतो,थकवा वाटतो कफ आजार कळतात,बध्दकोष्टताअपचन,मळमळ,अँसिडिटी कळते
३) खोल अभिव्यक्ती --- यात
आपल्या बोटांच्या स्पर्शात स्पदनाने पहिले तर्जनी वात प्रकृती जलद.मधली तर्जनी हळु ते पित्तप्रकृती आणि अनामिका हि अस्पष्ट लागल्यावर कफ प्रवृती दाखवते.
४) उपदोष पातळी -- यात अंगठ्या जवळची तर्जनी स्पंदन हेउथळ,सपाट असल्यास शरिरात प्राणवायु कमी.अशक्तपणा .भुक लागत नाही.चक्कर,थकल्या सारखे वाटते,आठवण पडते.दुसरे तर्जनीचे स्पंदन फटफट ,कमीअधिक लागत असेल अंगात उदानवायु गँसेस.पचनाचे आजार.पोट दुखते संडास साफ होत नाही.मुळव्याध
आणि तिसरी तर्जनी मंद.हळु स्पर्श होत असेल तर समनवायु म्हणजे बुध्दीक असमाधान. विचारी.लक्षात रहात नाही.वैचारिकडरपोक.घाबरणे.संधिवात.कंबर दुखी.स्नायू दुखणे इ.आजार होत आसतात.
नाडी परिक्षण हे पुर्वी वैद्य. पंडित.ब्राम्हण.जोतिषशास्र.पुजारी
करत होती.त्यानुसार वनस्पतींची जडीबुटी.पान फुल.मुळ्या.यांचा काढा.अथवा गोळ्या.चुर्ण.रस.धृत
रसायन वटी स्वरुपात बनवुन रोगी
पेशंटला आजारपणांत देऊन कायमस्वरुपात रोगमुक्त समुळ नष्ट करण्यात यश मिळत होते.
आज नाडी परिक्षण सहसा करतांना कोणी वैद्यक .डाँक्टर दिसत नाही.आधुनिक उपचार पध्दतीचा उपचार करुन रोगमुक्त होण्यासाठी प्रयत्न असतो.पणं नाडी परिक्षण हिच खरी पध्दत कमी खर्चिक असुन आजार समुळ नष्ट करणारी आहे.
मार्गदर्शन डॉ एम.बी.पवार विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी नाशिक
Tags:
आरोग्य