आदिवासी सेवा सहायक व शिक्षण प्रसारक संस्था संचलित, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर येथील वादविवाद मंडळच्यावतीने कै. सेठ द्वारकाप्रसाद हंसालालजी अग्रवाल स्मृती करंडक आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. स्पर्धेचा विषय होता 'एक राष्ट्र एक निवडणूक पद्धत राष्ट्रीय हितासाठी योग्य आहे / नाही'.
स्पर्धेचे उद्घघाटक म्हणून महिला महाविद्यालय नंदुरबार येथील प्राचार्य डॉ. सुनील कुवर हे उपस्थित होते. संस्थेचे सहसचिव श्री अजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.जी. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. मंचावर प्रमुख अतिथी आणि वादविवाद स्पर्धेचे दातृत्व अग्रवाल कुटुंबियातील श्रीमती सुरेखाबेन अजयकुमार अग्रवाल, श्रीमती मंजुळाबेन हरीशकुमार अग्रवाल, श्री. अक्षित हरीशकुमार अग्रवाल, सौ. निकिता अक्षीत अग्रवाल, श्री. आशुतोष मनोजकुमार अग्रवाल, सौ प्रियंका आशुतोष अग्रवाल, श्री. अभिषेक मुकेशकुमार अग्रवाल, सौ. रूपल अभिषेक अग्रवाल यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढवून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. एम . ए. गावित मंचावर उपस्थित होत्या. उद्घघाटक प्राचार्य डॉ. सुनील कुवर यांनी वादविवाद स्पर्धेचे उद्घघाटन झाले असे जाहीर करून आपल्या मनोगतांमध्ये अग्रवाल कुटुंबियांचे मनापासून आभार व्यक्त केले, त्यांनी केलेल्या दानामधून ही वादविवाद स्पर्धा संपन्न होत आहे याचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे. त्याच बरोबर या कुटुंबांनी या शहराप्रति दाखवलेली उदारमतवादी भूमिका आणि आतापर्यंत त्यांचे एकंदरीत मानवतावादी कार्य याही बाबींचा त्यांनी आपल्या भाषणांमध्ये आवर्जून उल्लेख केला. स्पर्धकांना शुभेच्छा देऊन, विद्यार्थ्यांनी बोलण्यापेक्षा मंचावर येऊन सहभाग घेणे याला अतिशय महत्त्व आहे हे देखील त्यांनी पटवून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अजय पाटील यांनी स्पर्धकांचे अभिनंदन करून, अग्रवाल कुटुंब्याच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे देखील त्यांनी अभिनंदन केले आणि अशा प्रकारचे कार्यक्रम होणे हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत ही भूमिका अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. जी. जयस्वाल यांनी आपल्या मनोगतामध्ये आलेल्या स्पर्धकांचे मनापासून स्वागत करून, त्याचबरोबर दाते अग्रवाल कुटुंबियांचे त्यांच्या दातृत्वाच्या संकल्पनेचे कौतुक करून भविष्यामध्ये वाढीव दानाची मागणी केली. या मागणीला अग्रवाल कुटुंबीयांनी संमती देखील दर्शवली.
श्री. अक्षित अग्रवाल यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या समाजपयोगी कार्याचा आढावा घेत हा वारसा नवीन पिढी असाच पुढे चालू ठेवू अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वादविवाद मंडळाचे अध्यक्ष प्रा. ई .एस. गेडाम यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. सी.एल. सुरवाडे तर आभार प्रा. पी.बी .बागुल यांनी केले.
उद्घघाटन कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर लगेचच वादविवाद स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. एकूण 13 संघांनी सहभाग घेऊन उस्फूर्त पद्धतीने त्यांनी विषयाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजूने आपली मते मांडली. त्यानंतर सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे संघ घोषित करून तसेच उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांनासह सर्वांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून डॉ. नितीनकुमार माळी, श्रीमती डॉ. योगिता पाटील आणि कु.प्रा. शर्मिला गावित यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षकांची भूमिका पार पाडली.
समारोप समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष व दाते हरीशकुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. समारोपकर्ते म्हणून संस्थेचे सहसचिव श्री. अजय पाटील हे उपस्थित होते. श्री अक्षित अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करताना समाज उपयोगी कार्य करणे आवश्यक आहे असे आवाहन केले. परीक्षकांच्या मनोगतामध्ये डॉ. नितीनकुमार माळी यांनी अत्यंत उत्साह पूर्वक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विषयाची योग्य पद्धतीने मांडणी केल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले, तसेच जे स्पर्धक यामध्ये काही कारणास्तव त्यांना बक्षीस मिळू शकले नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न करण्याची गरज असून आपण कुठे कमी पडलो याचा चिंतन करून पुन्हा उभारी घेणे महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले. त्यानंतर परीक्षकांनी जाहीर केलेल्या निकालावर आधारित प्रथम क्रमांक, पायल देविदास चव्हाण व समिधा रहीम शेख कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर संघाला घोषित करण्यात आला. द्वितीय क्रमांक पियुष यादव व रोहन जितू गावित श्री. सु.ही. नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर यांना घोषित करण्यात आला, तर तृतीय क्रमांक काकासाहेब चौधरी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नंदुरबार येथील अंजली सुभाष माळी व मिसबा अंजुम सलारखान यांना घोषित करण्यात आला उत्तेजनार्थ बक्षीस अनन्या चेतन पाटील आणि मेघा विलास पाटील यांना देण्यात आले. त्याचबरोबर सार्वजनिक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी वादविवाद स्पर्धेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला त्याबद्दल त्यांना देखील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए . जी.जयस्वाल यांच्या वतीने प्रत्येकी दोन विद्यार्थिनींना पाचशे रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेसाठी वादविवाद मंडळ, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू - भगिनी तसेच चतुर्थ वर्ग करमचारी या सर्वांचे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले.
Tags:
शैक्षणिक