अहमदनगर जिल्ह्यातील नवीन व्यापाऱ्यांना जीएसटी नोंदणी घेताना येणारी तांत्रिक अडचण दुरुस्त व्हावी- नितीन डोंगरे

.    अहिल्यानगर सत्यप्रकाश न्युज 
    राज्य शासनाकडून राज्यातील काही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली औरंगाबादचे नाव "संभाजीनगर" उस्मानाबादचे "धाराशिव" आणि त्याच प्रमाणे आपल्या अहमदनगरचे "अहिल्यानगर" अशी नावे बदलण्यात आली. त्याप्रमाणे शासकीय गॅझेट निघाले 
आणि त्या त्या ठिकाणी अहमदनगर ऐवजी "अहिल्यानगर" नावाच्या नोंदी शासन दरबारी लागल्या. 
  अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाल्यामुळे सहाजिकच "जीएसटी कायद्यानुसार जीएसटी पोर्टलवर सुद्धा" अहमदनगरचे नाव "अहिल्यानगर" असल्याचा उल्लेख दिसू लागला. 
यामध्ये एक महत्त्वाची अडचण निर्माण झाली ती अशी की ज्यावेळेस एखाद्या व्यापाऱ्याला जीएसटी कायद्यानुसार 
नोंदणी दाखला घ्यावा लागतो, 
अशावेळी तो दाखला जीएसटी पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरून व कागदपत्रांच्या नकला जोडून तो अर्ज ऑनलाईन दाखल करायचा असतो.
        असा अर्ज दाखल करताना पोर्टलवर अर्जदाराने सर्वप्रथम त्याची व्यवसायाची माहिती भरायची असते. ही माहिती भरत असताना त्यामध्ये राज्याचे नाव महाराष्ट्र व त्यापुढे जिल्हा कॉलम मध्ये पोर्टलवर नमूद केलेल्या जिल्ह्यातून एका जिल्ह्याची नोंद करायची असते..   
      त्यामध्ये अगोदरच पोर्टलवर अहमदनगर ऐवजी "अहिल्यानगर" नावाचा उल्लेख असल्यामुळे, साहाजिकच अर्जदाराला अहिल्यानगर नावावर "टिक मारावी लागते" व पुढच्या विंडोमध्ये म्हणजेच प्रमोटर किंवा पार्टनर यांची व्यक्तिगत माहिती आणि रहिवासाच्या जागेचा पत्ता लिहिण्यासाठी माहिती सादर करावी लागते, अशावेळी ही माहिती सादर करत असताना त्या ठिकाणी पुन्हा अर्जदाराचा रहिवासाच्या पत्त्याचा जिल्हा कोणता ? अशी विचारणा केली जाते 
त्या ठिकाणावर मात्र पोर्टलवर "अहिल्यानगर ऐवजी अहमदनगर" असे जिल्ह्याचे नाव देण्यात आलेले आहे त्यावर टिक केल्यानंतर अर्जदाराचा अर्ज पुढे जात नाही.व इथे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया थांबते.अर्ज पुढे न गेल्यामुळे त्याला त्याची इतर माहिती पोर्टलवर नोंदणी दाखला मिळण्यासाठी सादर करता येत नाही 
ही एक फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. सदरची अडचण ही तांत्रिक स्वरूपाची आहे.
  यासाठी अनेक करसल्लागार, सीए यांनी त्यांच्याकडील नोंदणी प्रकरणाबाबत ग्रीव्हियन्स कडे तक्रार करून देखील अद्याप पर्यंत ग्रिव्हीयन्स कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही वा खुलासा होऊ शकलेला नाही व त्याला उत्तर मिळालेले नाही,
त्यामुळे केवळ वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.नासिक व नगर कार्यालयाशी या बाबत संपर्क साधून देखील अद्याप हा दोष दुरुस्त होऊ शकलेला नाही अशी माहिती नितीन दत्तात्रय डोंगरे
अध्यक्ष नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post