शहादा येथे तीन दिवसीय कलाशिक्षण परिषद संपन्न. शुभांगी ताई पाटील व मान्यवरांच्या हस्ते कला शिक्षकांना पुरस्कार वितरण....

      धुळे सत्यप्रकाश न्युज 
  महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्न नंदुरबार जिल्हा कलाध्यापक संघ द्वारे आयोजित 
"४३ वी तीन दिवसीय कलाशिक्षण परिषद" नुकतीच शहादा येथे पार पडली. या परिषदेला महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील कलाध्यापक व अध्यापिका तसेच कलाक्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. 
 याप्रसंगी कला क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या राज्यातील कला शिक्षकांना महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष तथा शिवसेनेच्या राज्य उपनेते शुभांगी ताई पाटील तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार आ किशोर भाऊ दराडे व  राष्ट्रवादी पक्षाचे श्री राजेंद्र जी भोसले , कलाध्यापक संघाचे राज्याध्यक्ष नरेंद्र बराई, राज्य उपाध्यक्ष बलराम सामंत, राज्यचिटणीस दिगंबर जी बेंडाळे, राज्य कोषाध्यक्ष विजय सिंह ठाकुर, राज्य सरचिटणीस प्रकाश जी पाटील  यांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.
     दरवर्षी होणाऱ्या या कलाशिक्षण परिषदेचे यजमानपद यावर्षी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला मिळाले होते व त्यानिमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे सदरची कलाशिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील कला शिक्षकांना या परिषदेत आपल्या विविध कलागुणांचे दर्शन घडवून आणण्याचा वाव यानिमित्ताने मिळत असतो. ज्यामध्ये चित्रकलेसह, रांगोळी, गायन, नृत्य इत्यादी कलागुण या परिषदेत राज्यभरातील कलाशिक्षक सादर करत असतात. त्याचबरोबर राज्यभरातील कलाशिक्षक आपल्या कलेचे व विचारांचे या परिषदेत अदान प्रदान करत असतात. त्याचप्रमाणे राज्यभरातील कला शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणी व समस्या याबाबत देखील चर्चा केली जाऊन त्या सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. यावेळी उत्तर महाराष्ट्राने अतिशय भव्य दिव्य अशा तीन दिवसीय कलाशिक्षण परिषदेचा कार्यक्रम शहादा येथे आयोजित केला होता. खानदेशात प्रथमच हा कार्यक्रम होत असल्याने कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी गीत व नृत्याने करण्यात आली.
     कार्यक्रमाचे आयोजन राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र साहेबराव भोसले, नाशिक विभागीय उपाध्यक्ष श्री चंद्रकांत एच पाटील नाशिक विभाग सहकार्यवाह श्री संजयजी मंगळे व नंदुरबार जिल्हा व शहादा तालुका कलाध्यापक संघाद्वारे करण्यात आले होते. तर कार्यक्रमाची उत्तम असे सूत्रसंचालन जोंधळे सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post