निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर केल्यानंतर दि १५अॅक्टोबर पासून आचारसंहिता लागू झाली आहे या बाबत नवापूर विधानसभा मतदारसंघा चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नंदूरबार रो ह यो चे उपजिल्हाधिकारी श्री महेश चौधरी यांनी तहसीलदार यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन महिती देताना सांगितले की नवापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती करण्यात आल्या मूळे लोकसभेत नवापूर मतदार संघ अव्वल ठरला त्याची पूर्नावृती या निवडणुकीत देखील करण्यासाठी प्रयत्नशील राहू जाति जास्त मतदान करण्यासाठी नागरिकांना प्रेरीत करावे
तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
नवापूर विधानसभा मतदारसंघात श्री दत्तात्रय जाधव तहसीलदार सो नवापूर
श्री डी एम देवरे गटविकास अधिकारी
श्री अविनाश गांगुर्डे मूख्यधिकारी नगर परिषद हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहातील
निवडणूक वेळा पत्रक
दि २२अॅक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल या दिवसा पासून ते २९ आॅक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील
या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही
दि २६/१०/२०२४ रोजी चौथा शनिवार व दि २७ /१०/२०२४ रोजी रविवारी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार नाहीत
*अर्ज छाननी* ३० आॅक्टोबर
*अर्ज माघारी* ४ नोव्हेंबर
*मतदान तारीख* २० नोव्हेंबर
*मतमोजणी*. २३ नोव्हेंबर
मतमोजणी ठिकाण* श्री सूरूपसिंग नाईक नगर भवन
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठिकाण* निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय तहसीलदार यांचे दालन
अनामत रक्कम
रू ५००० हजार इतकी असेल
एकूण मतदान केंद्र व मतदार
मतदान केंद्र ३३६
एकूण मतदार २९४४९४
पूरूष. १४२१८२
स्री १५२३१२
नविन मतदार ३८३२
मतदान केंद्रांवर पूरविण्यात येणाऱ्या सूवीधा
मतदारांना आरोग्य विषयक सुविधा पिण्याचे पाणी स्वच्छता गृह रॅम्प लाईट दिव्यांगसाठी व्हिल चेअर जेष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर प्राधान्य
कोण करणार घरी बसून मतदान
मतदान केंद्रांवर जाणे अशक्य असलेल्या ८५ वर्षा पेक्षा जास्त वय असलेले ४०%पेक्षा जास्त दिव्यांग मतदार कोव्हीड बाधित मतदार अशांना घरी बसून मतदान करता येणार आहे हे मतदारास बंधनकारक नसून अतिरिक्त उपलब्ध केलेली सूवीधा आहे
अत्यावश्यक सेवेत कार्यरत सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका सूवीधा
आचारसंहितेचे काटेकोर पालन न केल्यास
विना परवांगीने राजकीय पक्ष व उमेदवार यांनी पोस्टर भिंती पत्रक झेंडे कापडी फलक चिन्ह तसेच खाजगी व सरकारी मालमत्ता विद्रूपित केल्यास ३ महिने कारावास अथवा दोनहाजार रू दंड किंवा दोन्ही एकाच वेळेस संबंधित इसम पात्र राहील
आचारसंहितेचे तीन भरारी पथक
आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे यासाठी तीन भरारी पथके तयार केली असून या पथकाचे प्रमुख गटविकास अधिकारी श्री डी एम देवरे हे असतील
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आवाहन
नवापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्ष नागरिक मतदार प्रशासकीय यंत्रणा यांनी आवश्यक जबाबदारी पार पाडावी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री महेश चौधरी यांनी केले आहे
Tags:
शासकीय