आ.डाॉ ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शिवभक्त विद्या मंदिर या शाळेतील कु.रेश्मा सुभाष राठोड हीची वर्ल्ड कप साठी निवड

मुंबई सत्यप्रकाश न्युज 
      शिवभक्त विद्या मंदिर या शाळेतील क्रीडा प्रशिक्षक  नरेंद्र मेंगळ  व.पंढरीनाथ म्हसकर  यांनी  घेतलेल्या मेहनतीने व त्यांच्या योग्य मार्गदर्शनाने कु.रेश्मा सुभाष राठोड  हीची वाटचाल मोठ्या भरारीने पुढे जात आहे. वर्ल्डकप सिलेक्शन ट्रायल साठी निवड झाली आहे* कु.प्रियांका भोपी ही खेळाडू सुद्धा होती. 
         यावेळी आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी दोन्हीही खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यासोबत मेहनत घेतलेल्या क्रीडा शिक्षकाचे कौतुक केले..
   कुमारी रेश्मा सुभाष राठोड हिने खो-खो चे डे शिवभक्त विद्यामंदिरातील मैदानावर  इयत्ता पाचवी पासूनच गिरवायला सुरुवात केली होती.
    घरची परिस्थिती गरीब होती. एक वेळचं जेवण मिळत नसताना सुद्धा तिच्या आई-वडिलांनी मुलांना शिक्षणात काही कमी पडून दिलं नाही. प्रसंगी तिच्या आई-वडिलांनी मजुरी काम करून तशाही परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं. शिवाय तिची खेळाची आवड सुद्धा जोपासली तिला प्रोत्साहन दिल.घरची परिस्थिती बिकट असली तरी खेळातील तिची आवड लक्षात घेऊन प्रशिक्षक मेंगळसर व म्हस्कर  यांनी तीच्यातील गुण हेरले आणि तीच्या सरावाला सुरुवात केली . त्यावेळेस आ.डॉ ज्ञानेश्वर म्हात्रे  शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते.खेळाडूंना कोणत्याच गोष्टीची कमी त्यांनी पडू दिली नाही.खेळासाठी मैदान लाईट्स शिवाय स्पर्धे करता जाण्यासाठी लागणारा खर्च इतकेच नाही जे जे काही हवे असेल त्या सर्व सुविधा त्यांनी खेळाडूंना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही खेळाडू घडवत गेलो.अनेक खेळाडू शिवभक्त विद्यामंदिरच्या मैदानावर सराव करत असायचे पण त्यापैकी रेश्मा राठोड हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सुरुवातीला मैदानी स्पर्धेत सहभाग घेऊन आणि नंतर खो खो च्या मैदानात उत्तम सराव सुरू केला. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रोजचा नित्य नियमानुसार सराव ही तिच्या खेळाची जमेची बाजू आहे.
 वेग,डाईव्ह मारणे,पोल मारणे हे सर्व स्किल तिने आत्मसात केले. अगदी किशोरी गटातच तिने आपल्या खेळाची चुणूक दाखवायला सुरुवात केली. त्यावेळेस दिल्ली येथे पहिल्यांदाच सुरू झालेल्या *पहिल्या खेलो इंडिया खो-खो स्पर्धेत* मुली गटात चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राला विजय मिळवून दिला त्या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिचा गौरव करण्यात आला होता शिवाय *पाच लाखाची स्कॉलरशिप* त्यावेळेस खेळाडूंना देण्यात आली होती. त्यानंतर मुली गटात तिचा खेळ उंचावत गेला आणि आणि तिला *जानकी पुरस्काराने*  सन्मानित करण्यात आले त्यामुळे ती प्रोत्साहित होऊन तिने आणखी उत्तम प्रकारे सराव करायला सुरुवात केली महिला गटात तिने आणखी चांगली कामगिरी केली प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या संघात तिने आपले मोठे योगदान दिले महाराष्ट्राचा विजय साकारण्यात तिची  कामगिर मोलाची ठरली त्यातच नॅशनल गेम्स स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तिच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक मिळाल्यानंतर *सात लाखाच पारितोषिक* त्यांना मिळाले आणि खऱ्या अर्थाने तिने आपली घरची परिस्थितीत सुधारणा व्हायला सुरुवात केली. आजपर्यंत तिने पारितोषिकाच्या रूपाने 28 लाख रुपये जिंकलेले आहेत, तसेच खेळाच्या जोरावरच शासकीय सेवेत थेट नियुक्ती तिची झाली. नाशिक येथे क्रीडा कार्यालय या ठिकाणी ते कार्यरत असून नुकत्याच 13 जानेवारी 2025 पासून दिल्लीत होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेकरिता भारताच्या महिला संघात तिची निवड झाली. तिच्या मेहनतीची चीज झाले .अखंड चौदा वर्ष केलेली मेहनत आज फळास आली असं म्हणता येईल. तिला या स्पर्धे करता व तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Post a Comment

Previous Post Next Post