आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात HMPVअर्थात ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस या आजारांवर माहिती

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
आरोग्य धनसंपदा ग्रुप,आजिबाईचा बटवा
      मी कुणाल नवले. मु.पो.-नांदुर शिंगोटे  सिन्नर. नाशिक. या रविवारी एचएमपिव्ही  या चिन देशातुन निर्माण होणाऱ्या व्हायरस च्या आजाराच्या विषया वर माहिती.. 
सांगा ?
  HMPVअर्थात ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा एक संसर्गजन्य व्हायरस चिन देशात  निर्माण झाला आहे. या आधी २०२३ साली हा व्हायरस नेदरलँड ब्रिटन,फिनलँड,आँस्ट्रेलियाँ,कँनडा
आणि अमेरिका या देशांतही आढळला होता.हा गेल्या पन्नास वर्षाचा जुना व्हायरस आहे.याचा प्रसार लवकर होतो.प्राथमिक सखोल अभ्यासांती तो औषधाने लवकर बरा होतो.तसे घाबरण्याचे कारण नाही. या आधी आपणं कोरोना व्हायरस चा प्रसार आणि प्रादुर्भाव .औषधोपचार .लक्षणे व होणारे शारिरीक नुकसान.त्याच्या लक्षणांशी सामना करुन सखोल न्यानही घेतले.अर्थात तो होऊ नये म्हणून भारतात जवळजवळ ऐशी
टक्के व्यक्तीनी कोरोणा लस.प्रति
बंधक घेऊन जगात उच्चांक गाठला.त्यामुळे आता केन्द्र सरकारने जाहिर केले की. कोणीही घाबरु नये.भारतात हा आजार जास्त फोपवणार नाही.मात्र आजही या एचएमपीव्ही या आजारावर अद्याप कोणतिही अँन्टिव्हायरस लस उपलब्ध नाही.पण बहुतेक व्यक्तीवर त्याचा सामान्य प्रभाव पडणार.त्याची लक्षणे घरी राहुनच आपल्या फँमिली फिजिशियन डाँक्टरकडे जाऊन नियंत्रित करता येतात. विषेश घाबरण्याचे कारण नाही. पण दुर्लक्ष करु नका.नाही तर तो न्युमोनिया़ँ होऊन व्यक्ती मरणासन्न होऊ शकते.
         ह्युमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजे HMPV हे नांव गेल्या काही दिवसापासून अचानक सर्व प्रसार माध्यमातून आपणांस ऐकू यायला लागलयं.या संसर्गजन्य आजाराची लागणं चिन या देशातुन होऊन भारतात प्रथम कर्नाटक नतंर महाराष्ट्रात या विषाणुजन्य आजाराची लागण झाली.आता मंबुई सह इतर जिल्ह्यात शिरकावं होत असल्याने चिंता निर्माण झाली आहे.
          लक्षणे व चिन्हे
   एचएमपीव्ही हा आरएनए व्हायरस आहे.सर्वसाधारणपणे हा हिवाळ्यात .थंडीच्या गार वातावर
णात लवकर होतो.अश्या गार हवेत अंबक.थंड.गार पदार्थ उदाः -
लिंबू.दही.कढी.केळी.आचार.चिंच
खाल्ले तर अँलर्जी स्वरुपात सर्दी
खोकला.ताप,अंग दुखणे,डोकं दुखणे,हातपायात वेदना.डोळे गरम वाटणे.कफ होऊन खोकला येणे,घसा खवखवणे.गिळतांना त्रास होणे,दम लागणे.खोकल्याची उबळ येणे.श्वासोच्छवासाला त्रास होणे.थकल्यासारखे वाटणे.भुक लागत नाही.अशक्तपणा जाणवणे.
गिळतांना त्रास होणे,कोरडा खोकला येणे,चक्कर येणे,मन सतत बेचैन होणे.एकदंरित फ्ल्यु ची लक्षणे .इनफ्ल्युंन्झा होणे. अथवा ब्रान्कायटिज.पुढे न्युमोनियाँ होणे...इत्यादी लक्षणे जाणवतात.ह्या विकारात वेळीच स्वतःची काळजी घेऊन पथ्ये सांभाळुन आपल्या जवळच्या फँमिली फिजिशियन डाँक्टरांचा योग्य तो उपचार घ्यावा.
       एचएमपीव्ही हा व्हायरस पारामायक्झाव्हिरीडे फँमिली आणि कोरोना व्हायरस पेक्षा थोडा वेगळा आहे. प्रदिर्घ असु शकतो.संसर्ग होत असतो.
            उपाय व प्रतिबंध --
    १) घरात येतांना व जातांना नेहमीच हात.पाय साबणाने धुवावी.
    २) सोशल डिस्टेशिंग पाळावी.
गर्दीत जाऊ नये.
    ३)बाहेर जांताना नाकासह तोडांला मास्क वापरावा.
     ४)पाणी सतत गरम करुन प्यावे.
    ५) नेहमी अंबट,थंड पदार्थ खाऊ नये.
     ६) चहा.सुंठ.मसालेदार काढा. गरमागरम पदार्थ खावै.
     ७)घरात स्वच्छता ठेवा. घरासमोर डबकी.पाण्याचे तळे ठेऊ नये.
    ८) गर्दिच्या ठिकाणी जाऊ नये
          असुरक्षित गट
    सर्वात अगोदर हा आजार लहानमुलं आणि जेष्ट नागरिकांना अगोदर होतो.कारण यांची प्रतिकारशक्ती फार कमी असते. ज्यांना सतत अँलर्जी अथवा जुने आजार उदाः - व्हिटँमिन कमी. हिमोग्लोबिन कमी.सतत विचार.हायपरटेन्शन.डायबेटिज.कफ खोकला.क्षय.दमा.अस्थमा.यां
ना हा ह्युमन मँटोन्युमो व्हायरस होऊन एचएमपिव्ही आजार होऊ शकतो.हा विकार बरा होतो. वेळीच काळजी घ्यावी.डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.आपली प्रतिकार शक्ती वाढवा.सशक्त रहावे.
मार्गदर्शनक डॉ.एम.बी.पवार , विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी, नाशिक 
        

Post a Comment

Previous Post Next Post