आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांना नवीन आकृतीबंध लागू करून शिक्षक व शिक्षकेतर पद भरती सुरू करा! या मागणी सह शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी शुभांगी ताई पाटील यांनी घेतली राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांची भेट...

.   धुळे सत्यप्रकाश न्यूज 
राज्यातील आदिवासी विकास विभागा अंतर्गत येणाऱ्या खासगी अनुदानीत आश्रम शाळांना नवीन आकृतीबंध लागू करून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नविन पद भरती सुरू करण्यात यावी या मागणी सह. विभागातील आश्रम शाळेतील शिक्षकांना अडचणीच्या ठरणाऱ्या वेळेत बदल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी काल   इंद्रनील नाईक सो , राज्यमंत्री आदिवासी विकास ,उच्च व तंत्र शिक्षण, बांधकाम ,मृदा व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेतली.
      याप्रसंगी आदिवासी विकास विभागातील खाजगी अनुदानित आश्रम शाळांसाठी नवीन आकृतीबंध लागू करण्यात येऊन त्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे वाढविण्यात यावीत व त्यानुसार पदभरती करण्यात यावी , तसेच आदिवासी विकास विभागातील आश्रम शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मागील अनेक वर्षांपासून मागणी असलेला अडचणीच्या ठरणाऱ्या वेळेत बदल करण्या बाबत च्या मागणी चे निवेदन या प्रसंगी देण्यात आले. त्यावर मंत्री महोदयांनी एक महिन्याच्या आत या विषयावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी शुभांगी ताई पाटील यांना दिले . याप्रसंगी इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी शाल श्रीफळ देत सत्कार केला.
      त्याचबरोबर राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी काल शालेय शिक्षण विभागाचे सचिव व उपसचिव श्री सावंत साहेब यांची देखील मुंबई मंत्रालयात जाऊन भेट घेतली व  अंशतः अनुदानित शाळांवरील शिक्षकांचे पगाराचा पुढील टप्पा देण्यात यावा त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला पाच तारखेच्या आत करण्यात यावेत, तसेच मेडिकल बिले वेळेवर अदा करण्यात यावी यासह संच मान्यते त योग्य पद्धतीने शिक्षकांचे पद नमूद व्हावेत याबाबत विशेष चर्चा करून शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा संदर्भात निवेदन देत सदरचे प्रश्न तात्काळ सोडविण्याची देखील मागणी यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे यावेळी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post