भारतीय प्रजासत्ताक दिन आणि संविधान - सौ.वैशाली चव्हाण/ सोनवणे

.        धुळे सत्यप्रकाश न्युज 
     भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारतात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे .याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले आणि 26 जानेवारी विषयी 1950 रोजीपासून भारतीय संविधान अंमलात आले .पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर इसवी सन 1929 रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकीत  तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली .त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडण्यात आला .या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते .भारताचे राष्ट्रगीत गायले जाते आणि आदर व्यक्त केला जातो . हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे .या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली .
  प्रजासत्ताक दिनाचा इतिहास पाहिला असता भारताला ब्रिटिश राजवटी पासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले यामागे भारताचा स्वातंत्र्यलढा आणि क्रांतिकारकांची बलिदान यांचा मोठा सहभाग आहे .तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते .भारताचे मात्र कायदेही भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर आधारित होते .
भारताला स्वतंत्र संविधान हवे यासाठी 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली .या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला .या सभेत सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव 166 दिवसांसाठी खुला करण्यात आला आणि 2 वर्षे 11 महिने 18 दिवसाच्या कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केला .बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रति 24 जानेवारी 1950 रोजी  स्वाक्षांकित केल्या . दोन दिवसानंतर हे भारताची संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले .भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला .
  संविधानातील परिशिष्टे
भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे .समता, बंधुता ,स्वातंत्र्य, न्याय तसेच प्रज्ञा,शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली . 
 मूळ घटनेत 1 प्रास्ताविक, 8अनुसूची,25 भाग आणि 395 कलमे होती .सध्या भारताच्या राज्यघटनेत 1 प्रास्ताविका ,12 अनुसूची ,25 भाग,448 कलमे आणि5 परिशिष्टे आहेत .
संविधानाचे महत्व
भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत .तसेच धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवण्यात आला आहे .संविधानातून स्वतंत्र न्यायव्यवस्थेची स्थापना झाली आहे .संविधानातून लोकशाही, समता, बंधुता ,न्याय ,राष्ट्रीय एकता आणि एकात्मता या मूलभूत तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे .संविधानामुळे समाजात किमान समन्वय साधला जातो .संविधानामुळे जनतेच्या बाजूने निर्णय घेतले जातात .
     26जानेवारी1950 या दिवसापासून भारतीय राज्यघटना अंमलात आली ज्याने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार प्रदान केले .स्वातंत्र्याच्या लढ्याचा सन्मान करण्याचा आणि आपल्या लोकशाही व्यवस्थेच्या पाया रचणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा दिवस आहे.
शब्दांकन -सौ वैशाली योगेश चव्हाण/ सोनवणे -
लेखिका - क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त .

Post a Comment

Previous Post Next Post