कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना व नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 ते 26 जानेवारी यादरम्यान नंदुरबार जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय पथसंचलन प्रशिक्षण व सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. 26 जानेवारी 2025 रोजी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी नवापूर विधानसभेचे आमदार माननीय श्री शिरीषकुमार नाईक यांच्या शुभहस्ते महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी माननीय आमदार श्री शिरीषकुमार नाईक व मान्यवर यांना मानवंदना देत उत्कृष्ट पथसंचलनाचे सादरीकरण केले. ध्वजारोहण प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री हरीषकुमार अग्रवाल, कोषाध्यक्ष श्री अरिफभाई पालावाला, संचालक श्री जी के पठाणसाहेब, श्री अजयभाऊ पाटील, श्री दिलीप पवार,श्री राजू अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए जी जयस्वाल उपप्राचार्य डॉ.मंदा गावित यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची मानवंदना स्वीकारली. महाविद्यालयातील पथसंंचलनानंतर रा. से. यो च्या प्रशिक्षणार्थींचा चमू नवापूर तहसील कार्यालयाकडे रवाना झाला व तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नवापूर शहरातील इतर शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या समवेत त्यांनी तिरंग्यास मानवंदना दिली. पथसंचलनानंतर शिबिराच्या समारोप समारंभात महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वृंद यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. समारोप प्रसंगी मनीष शेवाळे, मनीष मिस्तरी,महेश तडवी, पंकज राजपूत, फाल्गुनी पाटील या शिबिरार्थींसह प्रशिक्षक डॉ. नितीनकुमार माळी यांनी शिबिरासंदर्भातील मनोगत कथन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ए जी जयस्वाल यांनी शिबिरार्थींच्या यशस्वी कामगिरीचे कौतुक करत भविष्यातील येणाऱ्या संधीचे सोने करा व यशस्वी व्हा असा संदेश दिला. दि.21 ते 25 जानेवारी 2025 यादरम्यान प्रशिक्षक श्री निवृत्ती सोनवणे (सी.गो.पाटील महाविद्यालय, साक्री) व डॉ. नितीनकुमार माळी (श्री सु हि नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर) यांनी स्वयंसेवकांना पथसंचलनाचे प्रशिक्षण दिले. शिबिर व पथ संचलन यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सचिन नांद्रे, नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ.विजय पाटील, विभागीय समन्वयक डॉ. अमोल भुयार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए जी जयस्वाल व उपप्राचार्य डॉ. मंदा गावित यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेखा बनसोडे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एकनाथ गेडाम यांनी परिश्रम घेतले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ सी एल सुरवाडे, प्रा पी बी बागुल,प्रा प्रदीप गावित, श्री पंजाबसिंग वळवी,महाविद्यालयाच्या उपहारगृहाचे संचालक श्री किरण चौधरी, हर्षल गावित,राजू मावची यांच्यासह स्वयंसेवक मानसी हिरे व पवन गावित यांचे विशेष सहकार्य लाभले.
Tags:
शैक्षणिक