नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षण उपसंचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 30 जानेवारी 2025 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी शिक्षक दरबार*ठिकाण:- M.K.D. शैक्षणिक संकुल, नवापुर रोड, शिवणनदी जवळ, विरचक, नंदुरबार.येथे दुपारी 3 ते 6.वाजेपर्यत आयोजित करण्यात आला आहे.
सदर शिक्षक दरबार प्रसंगी माध्यमिक-प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, वेतन पथक अधिक्षक यांचेसह माध्यमिक-प्राथमिक शिक्षण विभाग, समाजकल्याण आश्रमशाळा, पे युनिट विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
*तरी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या तालुक्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर बंधू-भगिनींना जाहीर आवाहन की, आपल्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी योग्य त्या कागदपत्रांसह आपण मोठ्या संख्येने शिक्षक दरबारासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे
Tags:
शैक्षणिक