उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा फेब्रु. मार्च २०२५, कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजित करण्याचे आयोजन करण्यासंदर्भात
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक.
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), नाशिक/धुळे/जळगांव/नंदुरबार.
३. शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा परिषद, नाशिक/धुळे/जळगांव/नंदुरबार.
४. शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, नाशिक/धुळे/जळगांव/नंदुरबार.
५. शिक्षणाधिकारी (योजना), नाशिक/धुळे/जळगांव/नंदुरबार.
यांचे प्राप्त संदर्भानुसार
१. दिनांक १७/०१/२०२५ रोजी मा. अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन सभेतील निर्देश.
२. राज्य मंडळ कार्यालयाचे जा.क्र.रा.मं./२०१ पुणे-४, दिनांक १७/०१/२०२५ रोजीचे पत्र.उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की. फेब्रु. मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक (इ.१२ वी) व माध्यमिक शलान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसंदर्भात कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित केलेबाबतचे प्रकटन व सप्ताहाच्या नियोजनाचा तक्ता सोबत जोडलेला आहे. सदर प्रकटन व सप्ताह नियोजन तक्त्यानुसार आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा डॉ.एम.व्ही. कदम सहसचिव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ यांनी दिली असून
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ !! कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह !!
(कालावधी-सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ ते रविवार २६ जानेवारी २०२५) पर्यंत खालील प्रमाणे उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे
सोमवार दि. २०/०१/२०२५
स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य, शिक्षक यांना संयुक्त सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर अंमलबजावणी करणेबाबत प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी माहिती देण्यात यावी
मंगळवार दि. २१/०१/२०२५
कॉपीमुक्त अभियानाची शपथ सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परिपाठाचे वेळी घेणे. (सोबत शपथेचा नमूना जोडला आहे.)
बुधवार दि. २२/०१/२०२५
शाळा स्तरावर मंडळ शिक्षासूचीचे वाचन करणे, मंडळाच्या उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचना, व प्रवेश पत्रावरील (Hall Ticket) सूचनांचे वाचन करणे. गैरमार्ग केल्यास होणान्या परिणामांची जाणीव करून देणे.
गुरुवार दि. २३/०१/२०२५
परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी याबाबत तज्ज्ञांमार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयमध्ये पालक व विद्यार्थ्यांना उद्योधन करणे.
शुकवार दि. २४/०१/२०२५
परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची तयारी, परीक्षा तणावमुक्त वातावरणात कशी देता येईल, उत्तरपत्रिका कशा प्रकारे लिहाव्यात याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे. तसेच राज्य मंडळामार्फत तयार केलेली चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविणे
शनिवार दि. २५/०१/२०२५
कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी कॉपीमुक्ती घोषवाक्यासह शाळा परिसरात जनजागृती फेरी काढणे.
रविवार दि. २६/०१/२०२५
ग्रामसभा बैठकीमध्ये मुख्याध्यापक/शिक्षक यांनी कॉपीमुक्त अभियानासंदर्भात वरील विषयांबाबत माहिती देणे व याबाबत जनजागृती करणे व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करणे.
तसेच सर्व परिक्षार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनीकडुन खालील शपथ घेऊन परिक्षेत गैरमार्गाचा अवलंब केला जाणार याची माहिती देण्यात यावी.
मी शपथ घेतो की, मी फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही.
जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन. तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने, निर्भिडपणे, तणावविरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे, आई वडीलांचे व गुरूजनांचे नाव उज्ज्वल करेन.
अशी माहिती विभागीय सहसचिव डॉ एम.व्ही.कदम यांनी दिली आहे.
Tags:
शैक्षणिक