नवापूर महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय गणराज्य दिनाचे पथसंचलन सराव शिबिराचे आयोजन

      नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, नंदुरबार जिल्हास्तरीय गणराज्य दिनाचे पथसंचलन सराव शिबिराचे आयोजन दि. 21/01/25 ते 26/01/25 या दरम्यान करण्यात आलेले असून, सराव शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम आज संपन्न करण्यात आला. त्यानिमित्ताने उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी सेवा सहायक व शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष मा. हरीशभाई अग्रवाल हे उपस्थित होते तर उद्घघाटक म्हणून नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. विजय पाटील सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून विभागीय समन्वयक डॉ. अमोल भुयार सर आणि महाविद्यालयाच्या उपप्राचार्य तसेच सिनेट सदस्य डॉ. एम. ए. गावित मॅडम या उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी डॉ. विजय पाटील सर यांनी आपल्या मनोगतामध्ये राष्ट्रीय सेवा योजना वक्तशीरपणा शिकवते हे पटवून देत प्रजासत्ताक दिन पथसंचलन प्रशिक्षण शिबिरामध्ये निवड प्रक्रिया कशी चालते याचे विश्लेषण करत विद्यार्थ्यांना शिस्तीत आचरण करण्याचे आवाहन केले.
प्रमुख अतिथी म्हणून अमोल भुयार सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे चार भिंतींच्या बाहेरील शिक्षण प्राप्त होतं हे सांगत मेहनतीच्या बळावर शिबिरांमधील प्रशिक्षण जीवनाला कलाटणी देणार ठरतं व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होते हे पटवून दिले.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.एम ए गावित मॅडम यांनी विशेष अतिथी म्हणून आपल्या मनोगतामध्ये हे स्पष्ट केले की राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थी घडवण्याचं महत्त्वाचं एक माध्यम आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये करून घ्यावा. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. हरीशकुमार अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये श्रमदान आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं साधन म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असून माणसाला माणूस म्हणून घडविण्याचे व प्रत्येक पिढीवर संस्कार करणारे केंद्र म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असे मत मांडले.शिबिरार्थींना पथसंचलनाचे प्रशिक्षण देण्यासाठी सु हि नाईक शिक्षण शास्त्र महाविद्यालय नवापूर येथील प्रा. डॉ. नितीनकुमार माळी व साक्री महाविद्यालयातील श्री निवृत्ती सोनवणे हे परिश्रम घेत आहेत.
आजच्या या उद्घघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेखा बनसोडे मॅडम यांनी करुन दिला.  सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. ई .एस. गेडाम यांनी केले तर, आभार प्रा. प्रदीप गावित यांनी केले. सदर कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. दिनांक 21 ते 26 जानेवारी 2025 या सहा दिवसाच्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए जी जयस्वाल, उपप्राचार्य डॉ.मंदा गावित यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर डॉ. सुरेखा बनसोडे प्रा. एकनाथ गेडाम, प्रा.प्रदीप गावित हे परिश्रम घेत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post