आज दिनांक २८.०१.२०२५ रोजी कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्र्वर म्हात्रे सरांनी शिक्षण मंत्री मा. ना. दादा भुसे साहेब यांची भेट घेतली सोबत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार मा. किशोर दराडे साहेब, पुणे विभागाचे शिक्षक आमदार मा. जयंत आजगावकर साहेब व अनेक शिक्षक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते,
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी १०वी व १२वीच्या बोर्ड परीक्षांशी संबंधित पर्यवेक्षक व केंद्र संचालक यांच्या अंतरबदलाबाबत घेतलेला निर्णय शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनुकूल नसून, या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली व उपस्थित असलेल्या आमदार महोदयांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि सूचना लक्षात घेऊन त्यामध्ये निश्चितपणे दुरुस्ती (बदल) करण्याबाबत मा. शिक्षण मंत्री दादा भूसे साहेब यांनी आश्र्वासित केले.
14 ऑक्टोबर 2024 रोजी अंशतः अनुदानित, अनुदानासपात्र शाळांना, शिक्षकांना टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले, त्याचा जीआर देखील करण्यात आला, परंतु बजेट मध्ये न आल्यामुळे किंव्हा नजर चुकीने राहिल्यामुळे ते हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये त्याची तरतूद न झाल्यामुळे राज्यातील 61 हजार शिक्षक टप्पा अनुदानापासून वंचित आहेत, त्यामुळे येणाऱ्या
आर्थिक बजेटमध्ये बजेटची तरतूद करून राज्यातील 61 हजार शिक्षकांना टप्पा आणून अनुदान मिळवून देण्यात यावे अशी विनंती केली.
सन 2024 25 च्या संच मान्यता देखील प्रलंबित असून त्यादेखील तात्काळ होण्याकरिता आपण सूचना द्याव्यात अशी विनंती केली, वरिष्ठ लिपिकांना वेतन संरक्षण देऊन त्यांना आहेत त्या शाळेत समायोजन करणे, माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळा सहायक हे पद महत्वाचे असून कोणत्याही प्रयोगशाला सहायकास सरप्लस न करता त्या निकषांमध्ये बदल करून शाळा तिथे प्रयोगशाळा सहाय्यक देण्याबाबत देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग रणजीत सिंह देओल साहेब, उपसचिव तुषार महाजन साहेब, उपसचिव समीर सावंत साहेब यांची देखील भेट घेऊन वरील प्रश्न आपण देखील सकारात्मकपणे मांडा आणि मंत्री महोदयाच्या निदर्शनास आणून शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताकरिता योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती केली.
याप्रसंगी विना अनुदान कृती समितीचे श्री खंडेराव जगदाळे, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रवीण लोंढे सर, प्रकाश मगर सर, जगदीश म्हात्रे सर, भरत जामनिक सर, रहाटे काका, संजय डावरे, विलास जाधव सर, आणि अनेक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक बांधव उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक