राजगुरुनगर (पुणे) येथील गोसावी समाजातील मुलीवर अत्याचार करून निघृण हत्या करणाऱ्या नराधमांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी
समस्त गोसावी समाज नवापूर यांच्या तर्फे करण्यात आली आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उपरोक्त विषयानुसार बुधवार दि. 29/12/2024 रोजी राजगुरुनगर जि. पुणे येथे भटके गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निघृण हत्या करण्यात आली. सदर कुटुंब हे भटके गोसावी समाजातील असून भटकंती करत आपले पोट भरण्यासाठी काही दिवसांपासून राजगुरुनगर जि. पुणे या ठिकाणी वास्तव्यास होते. पिडीत कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या परप्रांतिय नराधामाने दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून त्यांची निघृण हत्या केली होती. सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून याचा आम्ही नवापूर शहरातील तमाम भटके गोसावी समाज जाहिर निषेध करीत आहोत.
तरी महाराष्ट्र शासनाने सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून खटला फास्ट्रैक कोर्टात लवून नराधामास फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत कुटुंबाला मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून तत्काळ आर्थिक मदत मिळावी या बाबत आपण शाषनास योग्य तो पाठपुरवठा करावा ही विनंती.
निवेदनावर अॅड रोहिणी रवी गोसावी मधुकर मा. चव्हाण रमेश माणिक चहाण आदिंचा सह्या आहेत.
Tags:
सामाजिक