शिवसेना महिला आघाडी तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

धुळे सत्यप्रकाश न्युज 
  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात आज शिवसेना महिला आघाडी तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले. 
    याप्रसंगी शिवसेनेचा राज्य ओपन येत्या शुभांगी ताई पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या आठवणींना उजाळा दिला! आज या ठिकाणी जमलेल्या सर्वपक्षीय महिला आज राजकारणात केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या आशीर्वादामुळेच आहेत कारण त्यांनी जर महिलांना घरातून बाहेर निघण्याची व शिकण्याची प्रेरणा दिली नसती तर आज देखील महिला या पारतंत्र्यातच राहिल्या असत्या त्यामुळे सावित्रीबाई फुले यांची जयंती ही महिलांसाठी स्वातंत्र्य दिन असल्याचे यावेळी शुभांगी पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. 
     याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे, महानगर प्रमुख धिरज पाटील , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भा ई नगराळे महिला आघाडी चे जिल्हा समन्वयक संगिता जोशी, उप जिल्हा प्रमुख अरुणा मोरे,महानगर प्रमुख डॉ जयश्री वानखेडे, ज्योति चौधरी मुख्याध्यापक बन्सीलाल खलाने सर आदी समस्थ शिवसैनिक व विविध पक्षांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post