नवापूर येथे क्षमतावृद्धी टप्पा क्रमांक-02 चे शिक्षकांसाठी प्रशिक्षण

.     नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    येथील शहरातील आदर्श प्राथमिक शाळेत नवीन शिक्षण धोरणांतर्गत शिक्षक क्षमतावृद्धी 2.0 तालुकास्तरीय दुसरा टप्पा सुरू आहे. या प्रशिक्षणात तालुक्यातील 19 केंद्रातील शिक्षक सहभागी झाले आहेत.17 ते 22 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणात शिक्षक बंधू व भगिनी यांनी सहभाग नोंदविला.08 मार्च पर्यंत प्रशिक्षणाचे चार टप्पे पूर्ण होणार आहेत. शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरातील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 चे आयोजन मा.संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्यामार्फत आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020,राज्य अभ्यासक्रम आराखडा 2023, अभ्यासक्रम आराखडा 2024, शाळा गुणवत्ता मूल्यांकन, क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना, कार्यनीती, क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया, समग्र परिपत्रक अशा विषयांच्या समावेश आहे. गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे यांच्या मार्गदर्शनाने शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण तालुका समन्वयक म्हणून किशोर रायते शिक्षण विस्तार अधिकारी कामकाज पाहत आहेत. ते स्वतः प्रशिक्षणात समरस होऊन शिक्षकांची हितगुज साधत आहेत व तासिका घेऊन शिक्षकांना प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत.प्रशिक्षण मनोरंजक व आनंदात होईल याची काळजी घेत आहेत.
प्रशिक्षणार्थींना भोजन व दोन वेळा चहा देण्यात येत आहे.याकामी बीआरसी कार्यालयातील कर्मचारी नितीन पाटील,प्रशांत पाटील विक्रम मावची,चंद्रकांत सोनवणे,नितीन मराठे,सुनील माळी कामकाज पाहत आहे. तसेच तज्ञ मार्गदर्शक म्हणून गोविंद वाडीले, ज्ञानेश्वर पुराणिक, दिलीप गावित, बाल किसन ठोंबरे,प्रवीण ठींगळे,गोरख मराठे,अमोल कांबळे,तुषार पवार, गुणवंत गायकवाड,विवेक वाडिले, महेंद्र अहिरे,योगेश पवार,गंगाराम झांझरे,मिलिंद जाधव कांतीलाल वसावे, नितीन पाटील,उंबर्डी यांनी प्रशिक्षण दिले.

Post a Comment

Previous Post Next Post