नवापूर येथे गजानन महाराज प्रकट दिन भक्तीमय वातावरणात संपन्न

  नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रकट दिवसानिमित्ताने  होमहवन आणि जाहीर भंडाऱ्याचे आयोजन श्री. गजानन महाराज मंदिर, जनता पार्क गली नंबर ४, नवापूर येथे करण्यात भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
   यावेळी आ.शिरिषकुमार नाईक, उद्योजक धनंजय गावीत माजी नगराध्यक्ष दामुआण्णा बिराडे , प्रकाश पाटील,माजी नगरसेवक अजय पाटील, चंद्रकांत नगराळे सह परिसरातील असंख्य गजानन भक्तांनी
 परिवारासह दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला होमहवन ची पुजा शार्दुल पाठक यांनी मंत्रोपच्चाराने केली. 
   कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिराचे संचालक सौ. सुनंदा खैरनार श्री. संजय भिकन खैरनार (नि. ग्राम विकास अधिकारी प. स. नवापूर) सौ. आशा खैरनार व श्री कृष्णा भिकन खैरनार (खैरनार इलेक्ट्रिकल्स, नवापूर) इंजी. सचिन संजय खैरनार (गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर & बिल्डर) श्री गजानन कंन्स्ट्रक्शन, डॉ . मनीष कृष्णा खैरनारसह परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post