पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची भरती होण्याकरता जाहिरात देणे व अन्य प्रक्रियेसाठी शासनाने दिनांक 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत शेवटचे मुदत दिली होती.
मात्र राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये रोस्टर पडताळणी झालेली नाही तसेच पेसा अंतर्गत जिल्ह्यात रोस्टर तपासणी केली जात नाही, त्यामुळे राज्यातील अनेक संस्थाचालक मुख्याध्यापक प्रचंड तणावांमध्ये आलेले होते, म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ
ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे साहेब यांच्याकडे सदर जिल्ह्यांची रोस्टर तपासणीची मागणी केली होती, तसेच शिक्षण आयुक्त माननीय श्री सच्छिन्द्र प्रताप सिंग यांना दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ला निवेदन देऊन फोन वर चर्चा सुद्धा केली होती.
त्यानुसारआज सकाळीच माननीय शिक्षण आयुक्त यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना फोन करून 28 फेब्रुवारी2025 पर्यंत आपल्या मागणीनुसार पवित्र पोर्टल ला मुदतवाढ देत आहोत ,तसेच पेसा अंतर्गत जिल्ह्यातील रोस्टर सुद्धा तपासणीच्या सूचना मावक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत, असे त्यांनी सांगितले, त्यामुळे राज्यातल्या अनेक संस्थांना शाळांना या मुदत वाढीमुळे ज्यांचे रोस्टर तपासणी बाकी होते, व शिक्षक भरण्यापासून वंचित राहणार होते त्यांना फायदा होणार आहे.
पवित्र पोर्टल ला मुदतवाढ मिळावी व पेसा रोस्टर तपासून मिळावे या करिता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी घेतलेल्या मेहनतीला यश मिळाल्याबद्दल, अनेक संस्थाचालक,मुख्याध्यापक तणाव मुक्त झाले अशी माहिती विष्णू विशे संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना यांनी दिली आहे.
Tags:
शैक्षणिक