येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल येथे शिवजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्राचार्य मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या प्रमुख मेघा पाटील, वरिष्ठ शिक्षक भरत सैंदाणे, कार्यालय अधीक्षक संजय पाटकर, संज़ू मावची व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य मिलिंद वाघ यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर सर्वच मान्यवरांच्या हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले. या शिवजयंती कार्यक्रमानिमित्त परिसर स्वच्छ करून श्रमदानं करण्यात आले. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या स्फूर्तीगीताने सुरुवात करण्यात आली. शिवजयंतीच्या विविध घोषणा शिक्षक म सु पाटील यांनी देत वातावरण आनंदी व उत्साही करण्यात आले.
सूत्रसंचालन महेंद्र अहिरे यांनी केले तर आभार सी एस पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले...
Tags:
शैक्षणिक