सार्वजनिक गुजराती हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

 नवापूर : सत्यप्रकाश न्युज 
    दि एन.डी. अँड एम.वाय सार्वजनिक गुजराती हायस्कूल व शेठ एच.जे.शहा कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेच्या उप मुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.नरेंद्र पाटील, गुजराती विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती निर्जलाबेन सोनवणे,उर्दू विभागाचे पर्यवेक्षक श्री.जाहीद खान पठाण सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  श्री. नरेंद्र पाटील सर होते,या कार्यक्रमाच्या  प्रमुख अतिथी शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख होत्या. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शाळेचे उपशिक्षक श्री.विपुल प्रजापत यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान राजे होते. त्यानंतर शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती गीताबेन राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात  सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे एक न्यायप्रिय व प्रजेविषयी प्रेम असणारे  राजे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.नरेंद्र पाटील सर यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे परस्त्रीस माता भगिनी मानणारे व आदर करणारे राजे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे उपशिक्षक श्री. जी. एच. मणियार  यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करून अभिवादन केले. शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. संजयकुमार जाधव सर, शाळेच्या उप मुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख, उपप्राचार्य श्री.नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक श्रीमती निर्जलाबेन सोनवणे, श्री.जाहीद खान पठाण सर यांच्या मार्गदर्शनाने व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

Post a Comment

Previous Post Next Post