किशोरी सुनील मोकाशी हिची वेस्टन रेल्वेत महिला खो-खो संघात निवड ....

.      ठाणे सत्यप्रकाश न्युज 
     आ.  ज्ञानेश्वर म्हात्रे  यांच्या शिवभक्त विद्या मंदिर या शाळेतील कुमारी. किशोरी सुनील मोकाशी हीची वेस्टर्न रेल्वेत नोकरी व वेस्टर्न रेल्वे महिला खो-खो संघात निवड झाली झाली आहे.
      शिवभक्त विद्या मंदिर या शाळेतील क्रीडा प्रशिक्षक. नरेंद्र मेंगळ व पंढरीनाथ म्हसकर  यांनी  घेतलेल्या मेहनतीने व त्यांच्या योग्य मार्गदर्शनाने कु. किशोरी सुनील मोकाशी  हीची वाटचाल मोठ्या भरारीने पुढे जात आहे. 
         यावेळी आ.  ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी  किशोरी मोकाशी हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यासोबत मेहनत घेतलेल्या क्रीडा शिक्षकाचे कौतुक केले..
   कुमारी किशोरी सुनील मोकाशी हिने खो-खो चे धडे शिवभक्त विद्यामंदिरातील मैदानावर  इयत्ता पाचवी पासूनच गिरवायला सुरुवात केली होती घरची परिस्थिती बिकट असली तरी खेळातील तिची आवड लक्षात घेऊन प्रशिक्षक मेंगळसर व म्हस्कर सर यांनी तीच्यातील गुण हेरले आणि तीच्या सरावाला सुरुवात केली . 
 अनेक खेळाडू शिवभक्त विद्यामंदिरच्या मैदानावर सराव करत असायचे पण त्यापैकी किशोरी मोकाशी हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सुरुवातीला मैदानी स्पर्धेत सहभाग घेऊन आणि नंतर खो खो च्या मैदानात उत्तम सराव सुरू केला. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रोजचा नित्य नियमानुसार सराव ही तिच्या खेळाची जमेची बाजू आहे.
 धावण्यातील स्टॅमिना, उत्तम संरक्षण हे सर्व स्किल तिने आत्मसात केले.तिने अगदी किशोरी गटात चुणूक दाखवायला सुरुवात केली. 
    सुरुवातीला ठाणे जिल्हा महिला संघात तिची निवड झाली तिने केलेल्या खेळाचे कौतुक झाले त्यानंतर मुंबई विद्यापीठ  स्पर्धेत महिला संघात तिची निवड झाली. तिचा खेळ  दिवसेंदिवस उंचावत गेला त्यानंतर महाराष्ट्राच्या महिला संघात तिची निवड झाली आणि याच राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र अंतिम विजेता ठरला आणि तिला सुवर्णपदक पदक प्राप्त झाले खऱ्या अर्थाने तिच्या मेहनतीची चीज झाले .अखंड दहा वर्ष केलेली मेहनत आज फळास आली असं म्हणता येईल. तिच्या खेळाचे तिच्या मेहनतीचे खरंच कौतुक व तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्राप्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post