ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, पुणे या संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व प्रमाणित लेखापरीक्षक, सनदी लेखापरिक्षकांसाठी "दोन दिवसीय अधिवेशन तथा कार्यशाळेचे" आयोजन करण्यात आलेले असून, हे अधिवेशन "येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी", नाशिक नगरीत संपन्न होत असल्याची माहिती श्री .उमेश देवकर(सचिव ऑडिटर कौन्सिल) तसेच
कोपरगाव येथील प्रमाणित लेखापरीक्षक श्री नितिन डोंगरे यांनी दिली आहे.
या अधिवेशनाबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, "राज्यातील तमाम प्रमाणित/सनदी लेखापरीक्षकांचे सन २०२५ मधील "राज्यस्तरीय अधिवेशन व प्रशिक्षण कार्यशाळा" राज्यातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच "तपोभुमी नाशिक" येथील, बीएपीएस, श्री स्वामी नारायण मंदिर (गेट नं. २), डेन्टल कॉलेजच्या मागे, मुंबई आग्रा रोड, तपोवन, पंचवटी, नाशिक-३. या मध्यवर्ती ठिकाणी संपन्न होणार आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, नावनोंदणी साठी नाशिक ऑडिटर असोसिएशन चे श्री संदीप नगरकर प्रयत्नशील आहेत."
गेल्या ४ दिवसांपासून, असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रामदास शिर्के,
सचिव श्री.उमेश देवकर,
श्री.श्रीकांत चौगुले,
श्री. आबासाहेब देशमुख,
श्री.दत्तात्रय पवार,
श्री.संजय घोलप आदी पदाधिकारी नाशिक स्थळी मुक्कामास असून,
या संपूर्ण कार्यक्रमासाठी नाशिक ऑडिटर असोसिएशनच्या श्री.सुदाम निकम तसेच अन्य ऑडिटर्स बांधवांसोबत सुयोग्य नियोजन करीत आहेत.
राज्यातील ऑडीटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असो. महाराष्ट्र राज्य ही संस्था प्रत्येक वर्षी लेखापरिक्षकांसाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करीत असते. यामुळे लेखापरिक्षकांना सहकार कायद्यामधील नवनवीन सुधारणा, बदलांची माहिती मिळू शकते, शिवाय अशा कार्यशाळेत सहकार क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी मान्यवरांकडून उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याने राज्यातल्या बहुसंख्य जिल्ह्यामधून लेखापरीक्षक अशा कार्यशाळेसाठी आवर्जून उपस्थित रहात असतात.
येत्या शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी व शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी "नाशिक" येथे हे अधिवेशन संपन्न होणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून, मा.ना.श्री. बाबासाहेब पाटील साहेब (मंत्री, सहकार व पणन महाराष्ट्र राज्य) व राज्याचे सहकार आयुक्त मा. श्री दीपक तावरे साहेब(पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी, राज्यातील तमाम लेखापरिक्षकांना "लेखापरिक्षणाचे विविध विषयांवर" मार्गदर्शन करण्यासाठी,
मा. श्री दिपकजी तावरे साहेब
(सहकार आयुक्त तथा निबंधक पुणे)
मा. श्री. राजेश जाधवर साहेब,
(अप्पर निबंधक, लेखापरीक्षण, सह. संस्था पुणे)मा. श्री बाळासाहेब बडाख साहेब, (विशेष लेखापरीक्षक वर्ग १ फिरते पथक, पुणे)मा. श्री अमोल गावडे साहेब, (कोकण विभाग अध्यक्ष, ऑडीटर कौन्सिल)
श्रीमती रूपाली घोलप,मा. श्री. चेतन बंब साहेब, (प्रख्यात सनदी लेखापाल, नाशिक)
मा. श्री. एस बी पाटील साहेब,
(निवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव मंत्रालय)मा. श्री. टी. एस. अकाली साहेब, (सहाय्यक धर्मादाय आयुक्त १, नाशिक)
मा. श्री. संभाजी निकम साहेब
(विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक विभाग) मा. श्री. फयाज मुलाणी साहेब
(जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक)मा. श्री. अविनाश पाटील साहेब
(जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था वर्ग १, नाशिक) मा श्री. जितेंद्र निगडे साहेब ;विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरिक्षण) नाशिक
मा. श्री. संदिप जाधव साहेब
(उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक)श्री. व्ही. आर. सोनुने साहेब (सहाय्यक धर्मादाय आयुक्त २, नाशिक) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत, उत्कृष्ट लेखापरिक्षकांना देखील पुरस्कार वितरण करण्यात येणार असून, या संपूर्ण "दोन दिवसीय अधिवेशनासाठी" जेवण, निवासासह रु.२५००/इतके शुल्क ठेवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्री. रामदास शिर्के यांनी दिली.
ऑडिटर वेल्फेअर असोसिएशन च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी संपूर्ण राज्यभरातून, मोठ्या संख्येने लेखापरीक्षक बांधव हजर रहाणार असून, या ज्ञानसत्रासाठी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन
श्री. दत्तात्रय पवार, (सहसचिव)
श्री. आबासाहेब देशमुख, (उपाध्यक्ष),
श्री. उमेश देवकर (सचिव)
श्री. संदिप नगरकर (खजिनदार )
आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे
अधिवेशनाची नोंदणी रक्कम भरणा करणेसाठी, लेखापरिक्षकांनी, असोसिएशनच्या नावाने, आयसीआयसीआय बँक, शाखा केडगांव, अहमदनगर, बचत खाते क्र. ३२४७०१०००४२०, IFSC-
ICIC0003247 यावर प्रवेश फी भरून त्याची माहिती "नाशिक जिल्हा प्रतिनिधींकडे" त्वरित सादर करावी असे आवाहन असोसिएशनचे विश्वस्त
श्री. बाळासाहेब वाघ,श्री. श्रीकांत चौगुले, श्री. संजय घोलप, यांनी केले असून, त्यासोबत "गुगल फॉर्म" मध्ये सुद्धा आपली माहिती सादर करावी असे आवाहन करण्यात आले आहे. अधिवेशनासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वाना, संस्थेच्या खर्चाने, सहकार कायद्याविषयीची परिपूर्ण माहिती असलेली डायरी, उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात येणार असून, नांव नोंदणीसाठी काहीही अडचण असल्यास, लेखापरिक्षकांनी, ऑडीटर्स कौन्सिलच्या जिल्हा नियोजन समिती नाशिकचे पदाधिकारी
श्री सुदाम निकम, (अध्यक्ष)
मो. ९८२३१२३५८८
श्री धनंजय शेळके, (सचिव)
मो. ९७६४२७४९६१
यांचेशी त्वरित संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
Tags:
करविषयक
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसर
ReplyDeleteअतिशय उत्तम प्रसिद्धी दिल्याबद्दल, ऑडिटर कौन्सिल सदस्य या नात्याने मी आपला आभारी आहे.
आभारी आहे
ReplyDelete