. नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कर्करोग दिनाचे आयोजन करण्यात आले.
कर्करोगा विषयी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित म्हणाले की कर्करोग हा कोणालाही होऊ शकतो श्री पुरुष लहान बालके तसेच स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे स्तनाचा कर्करोग गर्भाशयाच्या कर्करोग तसेच पुरुषांमध्ये मुखाच्या कर्करोग होण्याची शक्यता असते, म्हणून कुठलीही भीती संकोच व लाजणं बाळगता डॉक्टरांकडून या संदर्भात लक्षणे दिसल्यास आपली तपासणी करून घेतली पाहिजे या पद्धतीने आपण कर्करोगाला प्रतिबंध घालू शकतो आणि झाल्यास उपचार व काळजी घेतली पाहिजे.
आपल्या उपजिल्हा रुग्णालय येथील असंसर्गजन्य रोग विभागामार्फत कर्करोगाची तपासणी व उपचार मोफत केले जातात याच्या नागरिकांनी व रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांनी केले.
समुपदेशक कैलास माळी यांनी कर्करोगाची कारणे लक्षणे व उपचार तसेच घ्यावयाची काळजी व प्रतिबंध विषयी सविस्तर माहिती दिली.
सदर कार्यक्रमात डॉक्टर युवराज पराडके, डॉ.रेचल वळवी डॉ. धीरेंद्र चव्हाण, डॉ . सुनील गावित डॉ. प्रीती गावित डॉ.रोहिणी मावची डॉ. हर्षदा बिश्वास नगराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Tags:
आरोग्य