नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित
दी. एन. डी अँड एम. वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच. जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय नवापूर. येथे शालेय स्तरावर पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
"प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना" अंतर्गत 'पंचायत समिती नवापूर ' द्वारा दि. एन .डी अँड एम. वाय. सार्वजनिक गुजराती हायस्कूल नवापूर येथे "पाककृती स्पर्धा" आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या एकूण 32 विद्यार्थ्यांच्या माता भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नवापूर केंद्राचे केंद्रप्रमुख शैलेश राणा होते
सदर पाककृती स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून...
१) गुजराती बालवाडीच्या मुख्याध्यापिका श्रीमती एकता बेन देसाई
२)उर्दू प्राथमिकच्या मुख्याध्यापिका साजिया पठाण
३) सार्वजनिक गुजराती च्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमल परीख
यांनी काम पाहिले. सर्व उपस्थित परीक्षकांचे दि. एन.डी.अँड.एम.वाय सार्वजनिक हायस्कूल, नवापूर येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय कुमार जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री बिरारीस सर व सार्वजनिक गुजराती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय कुमार एल जाधव सर , उपमुख्याध्यापिका श्रीमती कमल परिख व पर्यवेक्षिका श्रीमती निर्जला सोनवणे उपस्थित होते.
सर्व मातांनी पोषणयुक्त आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन ज्वारी, तांदूळ, बाजरी, गहू, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या व घरातील मसाले पदार्थांचा उपयोग करून पदार्थ बनवून आणले होते ज्यात तांदळाच्या भाकरी, मुगाच्या डाळीची पुरणपोळी, नागलीच्या पिठाचा शिरा, खीर, मिक्स धान्यांचे वडे इत्यादी पदार्थांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व केंद्रप्रमुख श्री शैलेश राणा यांनी स्पर्धक माता भगिनींना पोषण व प्रथिने मिश्रित आहाराचे महत्त्व सांगितले व आपल्या बालकांना बाहेरील पॅकेट्सचे पदार्थ न देता घरातील हिरव्या पालेभाज्या, तृणधान्य व कडधान्य मिश्रित पदार्थांचा डब्यात जास्त उपयोग करून पदार्थ बनवून देण्यास आपल्या मार्गदर्शनातून प्रोत्साहन दिले. शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय कुमार एल जाधव सरांनी स्पर्धकमातांना सांगितले की आजची पिढी आपल्या दररोजच्या आहारात भाकरी न खाता गव्हाच्या पिठाची पोळीचा जास्त उपयोग करते. पण ज्वारी, तांदूळ, बाजरी, नागली यांच्या भाकरींचा समावेश दररोजच्या आहारात गव्हाच्या पोळी पेक्षा जास्त असावा व दररोज गव्हाची पोळी खाण्यापेक्षा मल्टीग्रेन म्हणजेच विविध धान्य, कडधान्य मिश्रित पिठाची पोळी चा समावेश आहारात का असावा याचे महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी परिक्षकांनी 32 पदार्थांचे निरीक्षण करून त्यातून प्रथम द्वितीय व तृतीय अशे तीन विजेते क्रमांक काढण्यात आले. ज्यात श्रीमती सीमा सुरेश प्रजापत यांनी प्रथम क्रमांक मिळविला तसेच श्रीमती कविता राजेश पटेल यांनी द्वितीय क्रमांक व श्रीमती अफसाना माजीद पटेल यांनी तृतीय क्रमांक मिळविला. प्रथम क्रमांकाच्या मानकरी असणाऱ्या श्रीमती सीमा रमेश प्रजापत यांची केंद्रस्तरावर निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती बीनिता शाह मॅडम यांनी केले व आभार श्रीमती हेमलता बोरसे मॅडम यांनी मांडले स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी शाळेचे प्राचार्य उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
Tags:
शैक्षणिक