नवापूर तालुक्यातील नागरिकांच्या रेशन कार्ड संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्येक आठवडयाच्या बुधवारी " रेशन कार्ड अदालत "आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार श्री दत्तात्रय जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या अदालतीमध्ये नवीन रेशन कार्ड काढणे, नावात बदल करणे, नाव कमी करणे, नावात दुरुस्ती करणे, रेशनकार्डची ऑनलाईन दुय्यम प्रत तसेच महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजने संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. रेशन कार्ड, धान्य वाटप याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी आणि पुरवठा विभागाच्या ऑनलाइन कामांबाबतच्या समस्यांवरही या अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे
शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अदालतीमध्ये अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना तसेच प्राधान्य कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. या अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभघ्यावा, असेही आवाहन तहसिलदार श्री. दत्तात्रय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Tags:
शासकीय