नवापूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सव दिनानिमित्त पथसंचलन संपन्न


.   नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   गुडीपाडवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नवापूर मध्ये शताब्दी वर्षानिमित्त भव्य पथसंचलन करण्यात आले शहरातील द्वारकेश्वर महादेव मंदिरात शहरातील व परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एकत्रित झाले होते व येथूनच पथसंचलनाला सुरुवात झाली.
   यावेळी स्वंयसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील व कमलेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेने शहरातील विविध मार्गांवरून पुन्हा श्री द्वारकेश्वर मंदिरात पथसंचलनाची सांगता झाली.
  शहरातील विविध मार्गांवरून पथसंचलन होणार म्हणून महिला वर्गाकडून रस्त्यावर व आजु बाजूला सुशोभित रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांनी सजावट केली होती व उत्कृष्ट पथसंचलनात सहभागी स्वंयसेवकावर फुलांचा वर्षाव केला होता.
   अतिभव्य पथसंचलन पाहण्यासाठी शहरातील असंख्य धर्म प्रेमी बांधवांनी गर्दी केली होती व पथसंचलनात सहभागी स्वंयसेवक व बाल स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला .
   यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस बांधव व गृहरक्षक विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
    यावेळी शहरातील व परिसरातील असंख्य स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदविला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला.

 

Post a Comment

Previous Post Next Post