सूररत्न संगीत महाविद्यालयाच्या संगीत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण संपन्न...

.     नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   येथे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ संचलित "सुर रत्न संगीत विद्यालय नवापूरचा नोव्हेंबर महिन्यात झालेल्या संगीत परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देउन गौरव करण्यात आला.
   नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात शहरातील प्रसिद्ध उद्योजिका शीतल बेन वाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष शिरिष भाई शाह संचालक हेमंतभाई शाह विद्यालयाच्या संचालिका रत्ना रामोळे या मान्यवरांच्या हस्ते संगीत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिमाखात पार पडला.
   नवापूर शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातून विद्यार्थी संगीत परीक्षेत बसलेले होते. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनुक्रमे आमलाण, बोरझर व वासरवेल येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेतील बाळकिसन ठोंबरे, विजय साळवे, भानुदास रामोळे या संगीत शिक्षकांनी परिश्रम घेऊन विनामूल्य संगीताचे शिक्षण प्रदान केल्याचे समजले.
  अध्यक्षीय भाषणात शितल बेन वाणी यांनी आश्चर्य व्यक्त केले की आजच्या बक्षीस वितरण प्रसंगी शहरातील विद्यार्थी व पालक कमी आहेत तर ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचे प्रमाण अधिक आहे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला बसणे आणि उत्तीर्ण होणे ही फारच अभिमानाची बाब आहे. संगीत शिकवणाऱ्या या तिन्ही शिक्षकांचे विशेष कौतुक विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षण घेत घेत विशारद पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढे-पुढे मार्गक्रमण करायचे आहे. पुढे आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, या शिक्षकांनी संगीत शिक्षणाचा जो विडा उचलला आहे तो मला उचलायचा होता, माझा हा मनोदय या शिक्षकांच्या रूपाने पूर्ण होत आहे तेव्हा त्यांना मी धन्यवाद देते
    शिरीष भाई यांनी याप्रसंगी आपल्या भाषणात पालकांचे विशेष आभार मानले कारण त्यांनी संगीत विषयाचे महत्त्व समजून घेतले आणि आपल्या मुलांमध्ये ते रुजविले. मागील पंधरा वर्षापासून हे कार्य रामोळे सरांच्या प्रयत्नाने नवापुरात सुरू आहे. गीता मधील उपदेश त्यांनी केला "केल्याशिवाय काही मिळत नाही, केलेले वाया जात नाही, तुझ्यात काम करायची शक्ती आहे, To bring out, काम करत जा मग देवाला प्रार्थना कर"  आपल्यात असलेली शक्ती बाहेर काढ. अशा स्वरूपाचे हे कार्य रामोळे सर व त्यांचे
शिक्षक मित्र करत आहेत. आपल्या मुलांसाठी आम्ही काय करायला हवे ते आम्हाला सांगा आम्ही नक्कीच करू. सध्या मुलींसाठी आम्ही शाळेत कराटे क्लासेस सुरू केलेले आहेत. नवापुरात आम्ही हार्मोनियम तसेच भरत नाट्यम चे क्लासेस काही वर्षांपूर्वी सुरू केले होते, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही कारण शिक्षक बाहेर गावाहून येत होते त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे ते निघून गेले. तेव्हा मी आपणा तिन्ही शिक्षकांना सांगतो की आपण हे संगीत कार्य अविरत सुरू ठेवावे.
      हेमंत भाईंनी आपल्या भाषणात सर्वप्रथम ज्यांना अवॉर्ड मिळाले त्यांचे अभिनंदन केले आपण केलेल्या मेहनतीचे फळ आज मुलांनो तुम्हाला मिळाले.  21 जून "वर्ल्ड म्युझिक डे" असून सर्वात मोठा दिवस आहे म्हणजे सर्वात मोठ्या दिवसाला "संगीत दिवस" म्हणून निवड केली आहे. गीतम वाद्यम तथा नृत्यम, त्रयम संगीत मुच्यते" या संस्कृत वचनाचे स्पष्टीकरण भाईंनी केले. संगीताचे खूप फायदे आहेत हे आजच्या युगात प्रकर्षाने जाणवले आहे.  म्युझिक थेरीपीने दुर्धर आजारांवर उपचार देखील होत आहे. मन्नाडे साहेबांच्या "सुर ना सजे" या जुन्या संगीत विषयक गीताचा दाखला देऊन हे गीत भाईंनी गाऊन दाखवले. या गीतात संगीत विषयाचा पूर्ण अर्थ सांगितला आहे असे त्यांनी विशद केले. स्वतःकडे व शितल बेनकडे असलेल्या कराओके टीव्ही अटॅच सिस्टीम बाबत भाईंनी स्पष्टीकरण दिले, ही सिस्टीम बघण्यासाठी आपण माझ्या घरी चार ते पाच जणांच्या ग्रुपने येऊ शकतात. या सिस्टम मध्ये आपण किती प्रमाणात चांगले गायन केले आहे याबाबतचे गुण दिसतात. आपण गातांना कुठे चुकतो हे देखील या सिस्टम मध्ये दाखवले जाते तेव्हा अशा संगीत सिस्टमचा आपण अभ्यास करण्यासाठी नक्कीच माझ्याकडे यावे असे ते म्हणाले. 
    पालक वर्गातून आनंद वशिष्ठ यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, आपण आपल्या घरी क्लासमध्ये शिकवलेल्या संगीत विषयक रागांचा रियाज करावयाचा आहे तरच आपण यात पारंगत व्हाल "प्रॅक्टिस मेक मेन परफेक्ट".
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खैरनार इशस्तवन बाळकिसन ठोंबरे, प्रास्ताविक, स्वागत गीत व आभार भानुदास रामोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीत शिक्षक हाबेल गावीत, रणजीत राजपूत, विपिन प्रजापती, गणेश शिंपी, चेतन खैरनार, क्रिश बच्छाव, स्वरांगी, वेदिका, पंक्ती, इशा इत्यादींनी सहकार्य केले


Post a Comment

Previous Post Next Post