महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे अधिवेशन कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी येथे आयोजित केले होते, यावेळी महामंडळाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री सुनील पंडित सर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडले, उद्घाटन प्रसंगी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्माननीय योगेश दादा कदम, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार तथा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते
तसेच समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत उपस्थित होते.
दोन्ही मंत्री महोदयांनी, मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना अंशतः अनुदानित शाळांचा टप्पा अनुदान, जुनी पेन्शन, संच मान्यतेचे निकष बदलणे अन्य विषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवणार अशी आश्वासन दिले,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शाळा, विद्यार्थी, मुख्याध्यापक,संस्था, शिक्षक शिक्षकेतर यांचे एकूण 40 शैक्षणिक प्रश्नांवर मार्गदर्शन केले, सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आज पर्यंत कोणकोणत्या प्रकारचे विधिमंडळामध्ये प्रयत्न केले याविषयी माहिती सांगितली, व सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासित केले, तसेच दरवर्षीप्रमाणे मोठे बंधू कै. केशव दादा बारकू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एक लाखाची देणगी अधिवेशनास दिली व मतदार संघात अधिवेशन असल्याने अजून एक लाख रुपयाची मदत करून सुमारे दोन लाखाची आर्थिक मदत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघस सुपूर्द केले.
दोन दिवशी अधिवेशनाच्या दरम्यान शाळेची गुणवत्ता संवर्धन अभियान, नवीन शैक्षणिक धोरण, व अन्य शोधनिबंधांवर अभ्यासपूर्ण माहितीवर चर्चा केली, अनेक शैक्षणिक समस्यांचे ठराव पारित केले, सुंदर नीटनेटके अधिवेशन रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत , जिल्हाध्यक्ष आयुब मुल्ला, सचिव महेश पाटकर व त्यांच्या सर्व जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे काहीही कमी पडून देता यशस्वी केले, विशेष म्हणजे संस्थाचालक श्री इकबाल परकर साहेब यांनी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संघाला विशेष सहकार्य केले.
मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी चेअर पर्सन म्हणून कोल्हापूर विभागाचे एसएससी बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब, पुणे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे, मुख्याध्यापक संघाचे राज्याचे अध्यक्ष श्री तानाजी माने सर, माजी अध्यक्ष. प्रा.सुभाषराव माने , श्री अरुण दादा थोरात सर, जेके पाटील , आदिनाथ थोरात , मागील अधिवेशनाचे अध्यक्ष श्री विजय पाटील सर, उपाध्यक्ष श्री.नलावडे घुगरे , आर व्ही पाटील , श्री गोपाल पाटील , सचिव नंदकुमार सागर अरुण भोईर सर, मुंबई विभागीय अध्यक्ष अनिल पाटील ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श प्रवीण लोंढे, सल्लागार रमेश जाधव,चंद्रकांत दादा पवार, एल आर पाटील प्रमोद घोलप ठाणे जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी राज्यभरातून आलेले इतर सर्व मान्यवर मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक