नवापूर वरिष्ठ महाविद्यालयात विद्यापीठ परीक्षा आणि मूल्यांकन प्रक्रिया: कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न..

.  नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर येथे विद्यापीठ परीक्षा आणि मूल्यांकन प्रक्रिया: कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेचे समन्वयक डॉ.सुनील रामदास बोरसे यांनी आपल्या प्रस्ताविकेत अशा प्रकारच्या कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश काय असू शकतो? अशा कार्यशाळा घेतल्याने विद्यार्थी,  परीक्षार्थी, परीक्षक आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय कसा साधला जाईल, हे या कार्यशाळेचे  उद्दिष्ट आहे,
तसेच विद्यार्थी कॉफी मुक्त कसा होईल आणि परीक्षा सुरळीत कशा पार पडतील याच्यावर विचार मांडलेत. 
 या कार्यशाळेसाठी विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. एस पी. पवार, प्राचार्य औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा, यांनी  मार्गदर्शन आणि सादरीकरणात शिक्षकांकडून होणाऱ्या चुका त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील, विद्यार्थी भयमुक्त कसा होईल,परीक्षक म्हणून आपण कसे काम करायला पाहिजे इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केले.
 या  कार्यशाळेचे दुसरे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी, ग. तु. पाटील महाविद्यालय, नंदुरबार,व व्यवस्थापन परिषद सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी विद्यापीठाने परीक्षांचे नियोजन कसे करावे,उत्तर पत्रिकेतील तपासणीसाठी लागणारा वेळ, परीक्षक म्हणून काय जबाबदाऱ्या आहेत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधीत अडीअडचणी कशा सोडवल्या पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच  प्राध्यापकांकडून आलेल्या शंकांचे निराकरण  केले. 
 महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व सिनेट सदस्य डॉ. श्रीमती मंदा गावित यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कामात कशी मदत केली जाते, तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त कसे असावे व भयमुक्त पेपर कसा लिहावा त्याच पद्धतीने इतरही काही अडीअडचणी आल्यास त्या त्वरित सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. या कार्यशाळेत सुरुपसिंग हिऱ्या नाईक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयजी अहिरे उपस्थित होते 
कार्यशाळेसाठी आलेल्या मार्गदर्शकांचा परिचय प्रा. गौरव बोरदे यांनी केला तर  आभार डॉ. एस.बी. महाजन यांनी मानलेत.कार्यशाळेसाठी वरिष्ठ महाविद्यालय नवापूर, शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर, लोकनेते माणिकरावजी गावित वरिष्ठ महाविद्यालय विसरवाडी व खांडबारा येथील वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ महाविद्यालय नवापूर येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी या कार्यशाळेची  सांगता  राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने झाली.

Post a Comment

Previous Post Next Post