येथील एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती. कमलबेन परीख होत्या. या प्रसंगी शाळेचे उपप्राचार्य . नरेंद्र पाटील , पर्यवेक्षक श्रीमती. निर्जलाबेन सोनवणे, तसेच उर्दू विभागाचे पर्यवेक्षक जाहिद पठाण यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उर्दू विभागाच्या उपशिक्षिका श्रीमती फरझाना शेख यांनी डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित अत्यंत प्रेरणादायी वक्तव्य सादर केले. त्यांच्या भाषणातून डॉ. आंबेडकरांचे सामाजिक, शैक्षणिक व घटनात्मक योगदान अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गीता राजपूत यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन . जितेंद्र जगताप यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि सामाजिक समतेचे मूल्य जोपासण्याची प्रेरणा मिळाली.
शाळेच्या वतीने या जयंती सोहळ्याचे उत्तम नियोजन शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
Tags:
शैक्षणिक