मयत गाईचा विमा करिता शवविच्छेदन करण्यासाठी ४०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल गोपाळ पाटील यास लाज लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारच्या पथकाने पशुवैद्यकीय दवाखाना विसरवाडी येथे रंगेहात पकडले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील विसरवाडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल गोपाळ पाटील (वय २९) वर्ष याने तक्रारदार यांच्याकडून मयत गाईचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते. त्यानुसार मयत गाईचा शवविच्छेदनासाठी ४०० रुपयांची लाच मागितली होती. शवविच्छेदन करण्याची १५० रुपये फी गुगल पे द्वारे घेतले होती. परंतु यानंतर तक्रारदार यांच्याकडून ४०० रुपयांची लाच
मागितली होती. तडजोड अंति ठरलेली ३०० रुपयांची लाच पंचांसमक्ष १५ एप्रिल रोजी गुगल पे द्वारे स्वीकारली आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परीक्षेत्र, नाशिक पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे वालावालकर, सापळा पर्यवेक्षण
अधिकारी पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरीच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, पोनि नरेंद्र खैरनार, सपोनि विलास पाटील व पोलिस कर्मचारी हेमंत महाले, विजय ठाकरे, देवराम गावित, संदीप खंडारे, जितेंद्र महाले, सुभाष पावरा यांच्या पथकाने कारवाई केली.
Tags:
गुन्हे /अपराध